world cup : भारत-पाक संघाने विश्वचषकात खेळलेत 80 पेक्षा जास्त सामने, पाहा विजय-पराभवाचा रेकॉर्ड
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला काही तास शिल्लक आहेत.
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला काही तास शिल्लक आहेत. शनिवारी दुपारी अहमदाबादच्या रणागणांत भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे पारंपारिक प्रतिस्पर्धी एकमेंकासमोर उभे ठाकतील. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे. दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. खेळाडूच नव्हे तर चाहतेही सर्वस्वी तयारी करत आहेत. पाकिस्तान संघाने आतापर्यंत एका विश्वचषकावर नाव कोरले आहे तर भारताने दोन विश्वचषक उंचावले आहेत. पण विश्वचषकात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली आहे. दोन्ही संघाची विजयाची टक्केवारी कशी आहे.. याबाबत जाणून घेऊयात..
विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाचा रेकॉर्ड 65%
1975 पासून भारतीय संघ विश्वचषकात खेळत आहे. आतापर्यंत भारतीय संघाने विश्वचषकात 86 सामने खेळले आहेत. भारतीय संघाला विश्वचषकात 55 सामन्यात विजय मिळवता आलाय. तर 29 सामने गमवावे लागलेत. एक सामना टाय आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. विश्वचषकात टीम इंडियाच्या विजयाची टक्केवारी 65.29 टक्के इतकी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत दोन वेळा विश्वचषकावर नाव कोरले आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक उंचावला होता. त्यानंतर 2011 मध्ये धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक पुन्हा उंचवला आहे. विश्वचषकात भारताने आतापर्यंत दमदार कामिगिरी केली आहे.
विश्वचषकात पाकिस्तानची स्थिती काय ?
पाकिस्तान संघाचा विश्वचषकात विजयाचा रेकॉर्ड भारतापेक्षा थोडा कमी आहे. पाकिस्तान संगाने विश्वचषकात आतापर्यंत 81 सामने खेळले आहेत. त्यापैकी 47 सामन्यात त्यांनी विजय मिळवला आहे. पाकिस्तान संघाला 32 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. पाकिस्तान संघाची विश्वचषकातील विजयाची टक्केवारी 59.49 इतकी आहे. 1992 मध्ये पाकिस्तान संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने चषक उंचावला होता.
विश्वचषकात भारतच भारी -
वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर पाकिस्तान विश्वचषकातील पराभवाचा सिलसिला तोडण्यासाठी मैदानात उतरेल.
आणखी वाचा :