(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Cup: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारे 5 भारतीय खेळाडू, 3 यावेळीही संघात
World Cup: रविवारी भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामना गमावला आहे. हा सामना दोघांसाठी करा किंवा मरा असा असेल.
ICC T-20 World Cup 2021: भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पाकिस्तानकडून पराभूत झाल्यानंतर विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. रविवारी होणारा पुढील सामना दोघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण यावेळी गटातून फक्त 2 संघच पुढील फेरीत म्हणजेच उपांत्य फेरी गाठू शकतील. पाकिस्तानने पहिले दोन सामने जिंकून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. त्याचबरोबर या गटातून पुढचा संघ कोण असेल, हे भारत-न्यूझीलंड सामन्यावर अवलंबून असेल. भारतासाठी या सामन्यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे 5 पैकी 3 भारतीय खेळाडू यावेळच्या विश्वचषक संघात आहेत.
1- इरफान पठान
इरफान पठाणने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असून सध्या तो कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसत आहे. इरफान पठाणच्या नावावर न्यूझीलंडविरुद्ध टी-20मध्ये 5 विकेट्स आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी 3/31 अशी आहे. इरफानने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
2-रविंद्र जडेजा
यावेळी जडेजाचा संघात समावेश असून तोही जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या अष्टपैलू खेळाडूच्या नावावर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मध्ये 5 विकेट आहेत. जडेजाचा न्यूझीलंडविरुद्धचा इकॉनॉमी रेटही फक्त 5.88 आहे.
3- यूजवेंद्र चहल
यावेळी चहलचा टीम इंडियात समावेश नसला तरी न्यूझीलंडविरुद्ध त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. चहलने किवीविरुद्धच्या 10 सामन्यात 7 विकेट घेतल्या आहेत.
2- शार्दुल ठाकुर
शार्दुल गेल्या एक वर्षापासून टीम इंडियासाठी सातत्याने विकेट घेत आहे. तो न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मध्ये दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या 5 टी-20 सामन्यात त्याने 8 विकेट घेतल्या होत्या. न्यूझीलंडविरुद्ध त्याचा इकॉनॉमी रेट 10 च्या आसपास आहे. रविवारी शार्दुलचे संघात स्थान जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
5- जसप्रीत बुमराह
बुमराह 10 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. केवळ 9 सामन्यांमध्ये त्याने 10 किवी खेळाडूंची शिकार केली आहे. बुमराहची न्यूझीलंडविरुद्धची सर्वोत्तम कामगिरी 3/12 आहे. गेल्या काही वर्षांपासून बुमराह टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे आणि रविवारच्या सामन्यातही टीम इंडियाच्या गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावरच राहिली आहे.