एक्स्प्लोर

IND vs NZ Head to Head : भारतासाठी आज 'करो या मरो'चा सामना, कसा आहे दोन्ही संघाचा टी20 मधील आजवरचा इतिहास?

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. असून आजच्या दुसऱ्या टी2 पूर्वी दोघांचा आजवरचा हेड टू हेड रेकॉर्ड पाहूया...

India vs New Zealand, T20 Record : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात आज लखनौमध्ये तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील (T20 Series) दुसरा सामना खेळवला जाणार आहे. पहिला टी20 सामना रांचीमध्ये पार पडला ज्यात एक अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भारताने सामना 12 धावांनी गमावला. ज्यामुळे न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यानंतर आजचा सामना जिंकल्यास मालिकाही न्यूझीलंड जिंकेल. त्यामुळे भारताला आजचा सामना जिंकावा लागणार असून आजच्या या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी दोन्ही संघाचा आजवरचा एकमेंकाविरुद्धचा इतिहास जाणून घेऊ...

आजवरच्या इतिहासाचा विचार करता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 23 टी-20 सामने झाले आहेत, ज्यामध्ये जवळपास बरोबरीची स्पर्धा झाली आहे. येथे भारताने 12 सामने जिंकले असून न्यूझीलंडने 10 सामने जिंकले आहेत. तसेच दोन्ही संघांमधील एक सामना अनिर्णीत देखील  आहे. या सामन्यांचे निकाल पाहता येथे टीम इंडियाचा काहीसा वरचष्मा दिसत असला तरी आज एक रंगतदार सामना नक्कीच पाहायला मिळू शकतो. दरम्यान न्यूझीलंडचा संघ गेल्या 11 वर्षांपासून भारतीय भूमीवर टी-20 मालिका जिंकण्यात अपयशी ठरला आहे. 2012 मध्ये किवींनी शेवटची टी20 मालिका भारतीय भूमीवर जिंकली होती. न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 1-0 असा पराभव केला. त्यानंतर जेव्हा-जेव्हा न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर टी-20 मालिका खेळायला आला, तेव्हा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. 2017 मध्ये न्यूझीलंडने भारतीय भूमीवर तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली, जी भारताने 2-1 ने जिंकली. 2021 च्या मालिकेत टीम इंडियाने किवींचा 3-0 असा पराभव केला होता. 

भारतासाठी 'करो या मरो'चा सामना

न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा सामना भारतासाठी करो किंवा मरो असा असणार आहे. जर टीम इंडिया हा सामना हरली तर मालिका त्यांच्या हातून निघून जाईल. या मालिकेत किवी संघ 1-0 ने पुढे आहे. भारतीय संघाने गेल्या 10 वर्षांपासून घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमावलेला नाही. भारताने 2012 साली न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मैदानावर शेवटची टी-20 मालिका गमावली होती. त्यानंतर किवींनी दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 1-0 असा पराभव केला.

कधी, कुठे पाहू शकता आजचा सामना?

भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच हॉटस्टार Sony Liv अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.  याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

अशी असू शकते भारताची अंतिम 11

सलामीवीर -शुभमन गिल, ईशान किशन

मिडिल ऑर्डर फलंदाज - पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी  

ऑलराउंडर- हार्दिक पांड्या (कर्णधार),  दीपक हुडा, वॉशिग्टंन सुंदर

गोलंदाज - कुलदीप यादव, शिवम मावी, अर्शदीप सिंह

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget