IND vs ENG : Rohit Sharma आणि Cheteshwar Pujara दुखापतग्रस्त; टीम इंडियाच्या अडचणींत वाढ
IND Vs ENG : इंग्लंड दौऱ्यावर असणाऱ्या टीम इंडियाच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. टीम इंडिचे स्टार खेळाडू Rohit Sharma आणि Cheteshwar Pujara दोघेही दुखापतग्रस्त झाले आहेत.
IND Vs ENG : इंग्लंडच्या विरोधात खेळवण्यात येणाऱ्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा स्टार ओपनर रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दुखापग्रस्त आहेत. रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराच्या दुखापतीबाबत लवकरच अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.
टीम इंडियाच्या वतीनं दोन्ही खेळाडूंच्या फिटनेसबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी म्हटलं आहे की, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराच्या फिटनेसबाबत सोमवारी संध्याकाळपर्यंत स्पष्टता मिळू शकते.
विक्रम राठोड यांनी दोन्ही खेळाडूंच्या स्कॅनबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, "रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा दोघांनाही स्कॅनसाठी पाठवण्यात आलं होतं. तिसऱ्या दिवशी फलंदाजी केल्यानंतर रोहित आणि पुजारा दोघंही तकलीफमध्ये दिसून आले. सोमवारी संध्याकाळपर्यंत दोन्ही खेळाडूंची स्कॅन रिपोर्ट समोर येईल."
फिल्डिंगसाठी दोघेही मैदानावर अनुपस्थित
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्मानं इंग्लंड विरोधात खेळवण्यात येणाऱ्या ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 127 धावांची खेळी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळ संपल्यानंतर मात्र रोहित शर्माचे काही फोटो समोर आले होते. त्यामध्ये त्याच्या पायावर बॉल लागल्याचं निशाण दिसत होतं.
चेतेश्वर पुजाराला दुसऱ्या डावात एक धाव घेताना दुखापत झाली होती. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवावाही लागला होता. परंतु, फिजियो ट्रिटमेंटनंतर पुजारा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. दरम्यान, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा चौथ्या दिवशी फिल्डिंगसाठी मैदानावर उतरले नव्हते. पाचव्या दिवशीही दोन्ही खेळाडू मैदानावर उतरण्याची शक्यता फारच कमी आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळली जात आहे. शार्दुल ठाकूर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने इंग्लंडविरुद्ध रविवारी चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात 466 धावा केल्या. टीम इंडियाने 367 ची आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने इंग्लंड समोर आता विजयासाठी 368 धावांचं टार्गेट ठेवलं आहे.