(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs England, Ben Stokes : भारताकडून धुळदाण होताच बेन स्टोक्सने अंपायरिंगवर उपस्थित केले सवाल, आयसीसीकडे मोठी मागणी
India vs England, Ben Stokes : भारत आणि इंग्लंड दरम्यान, सध्या 5 सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी धुव्वा उडवत कसोटी क्रिकेटमधील सर्वांत मोठा विजय मिळवला. राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले होते.
India vs England, Ben Stokes : भारत आणि इंग्लंड दरम्यान, सध्या 5 सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 434 धावांनी धुव्वा उडवत कसोटी क्रिकेटमधील सर्वांत मोठा विजय मिळवला. राजकोटच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 557 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने दिलेल्या आव्हानाच पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 122 धावाच करु शकला. रवींद्र जाडेजा 5 विकेट्स पटकावत साहेबांना गुंडाळले. मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीला सुरु होईल. हा सामना रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
बेन स्टोक्सने अंपायरिंगवर उपस्थित केले सवाल, आयसीसीकडे मोठी मागणी
भारताकडून धुळदाण होताच बेन स्टोक्सने अंपायरिंगवर काही सवाल उपस्थित केले आहेत. बेन स्टोक्स म्हणाला, राजकोट कसोटीमध्ये डीआरएसच्या टेक्निकमध्ये कमी असल्यामुळे तीन निर्णय आमच्याविरोधात गेले. शिवाय, इंटरनॅशनल क्रिकेटमधून अंपायर्स कॉलचा नियम रद्द करण्याची मागणीही स्टोक्सने केली आहे.
Ruthless from Yashasvi Jaiswal 💥
— ICC (@ICC) February 18, 2024
He equals the record for most sixes in an innings in Men's Tests 👏#WTC25 #INDvENG pic.twitter.com/aboBFdVE0q
अंपायर्स कॉल डीआरएसचा हिस्सा आहे
पुढे बोलताना स्टोक्स म्हणाला, "आमची या सामन्यात तीन अंपायर्स कॉल वेळी अपील चुकीची ठरली. अंपायर्स कॉल डीआरएसचा हिस्सा आहे. एकतर तुमची अपील चुकीची असू शकते किंवा बरोबर..मी असे म्हणत नाही की, आमचा त्यामुळे पराभव झाला. 500 धावा खूप जास्त असतात. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात जॅक फ्रॅकली पायचीत झाला. जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले. जॅकच्या अंपायरने पायचीत दिल्यामुळेच बेनस्टोकने नाराजी व्यक्त केली. चेंडू लेग स्टंपला चाटून जात होता. त्यामुळे त्याला बाद देण्यात आले होते. जर अंपायरने त्याला नॉट आऊट दिले असते तर तो बाद झाला नसता. अंपायर्स कॉल जॅक फ्रॅकलीला लागू झाला.
Yashasvi Jaiswal opens up on his desire to score big runs 💪#WTC25 #INDvENGhttps://t.co/Ci9CKQAYTi
— ICC (@ICC) February 19, 2024
यंत्रणेत बदल करण्याची स्टोक्सची मागणी
पराभव झाल्यामुळे नाही तर खरच सिस्टिममध्ये बदल करण्याची गरज असल्याचे बेन स्टोक्स म्हणालाय. पहिल्या डावात देखील ओली पोपला बाद घोषित केल्याने साहेबांचा संघ नाराज झाला होता. मात्र, टीमने डीआरएस घेताच निर्णय बदलण्यात आला.
India skittle England for 122 to secure a record win in Rajkot 🎉#WTC25 | #INDvENG 📝: https://t.co/vfmNIRVFiF pic.twitter.com/00UTiT92KL
— ICC (@ICC) February 18, 2024
इतर महत्वाच्या बातम्या