IND vs BAN Test : भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, 'या' स्टार खेळाडूला विश्रांती
India vs Bangladesh : भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला असून आता दुसरा सामना 22 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे.
![IND vs BAN Test : भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, 'या' स्टार खेळाडूला विश्रांती India vs Bangladesh Test Series Bangladesh announce squad for second test know details IND vs BAN Test : भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बांगलादेशकडून संघ जाहीर, 'या' स्टार खेळाडूला विश्रांती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/12/19/36ec94703b743433165531d7293ae9341671447403912323_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs Bangladesh 2nd Test : भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतानं जिंकला आहे. आता दुसरा सामना 22 डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान या कसोटीपूर्वी बांगलादेशनं आपला संघ जाहीर केला आहे. बांगलादेशनं त्यांचा दमदार खेळाडू दुसऱ्या कसोटीत इबादत हुसेनला संघात स्थान दिलेलं नाही. दुखापतीमुळे इबादत दुसऱ्या सामन्यात संघाचा भाग होऊ शकलेला नाही.
बांगलादेशने भारताविरुद्ध 22 डिसेंबरपासून कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित दुखापतीमुळे संघात नसणार असून बांगलादेशलाही मोठा धक्का बसला आहे. स्टार वेगवान गोलंदाज इबादत हुसेन दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. पहिल्या कसोटी सामन्यातच इबादतला दुखापत झाली होती.
असा आहे बांगलादेशचा संघ
शाकीब अल हसन (कर्णधार) , झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकुर रहीम, यासिर अली, नुरुल हसन (विकेटकीपर), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, खालिद अहमद, नसुम अहमद, महमुदुल हसन खुशी, मोमिनुल हक, रजोर रहमान राजा, तस्कीन अहमद.
रोहितही सामन्याला मुकणार
दुसऱ्या वन डेमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने पहिल्या वन डेमध्ये खेळू शकला नाही. आता तो दुसऱ्या कसोटीतही खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध होणार नाही. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याने दुसरा सामनाही तो खेळणार नाही असं समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारताची मालिकेत 1-0 ची आघाडी
भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना चितगाव येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने यजमान बांगलादेशचा 188 धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या विजयासह भारताने या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता दोन्ही संघांमधला पुढचा सामना 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान मीरपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)