बांगलादेशला धक्का; भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी दिग्गज खेळाडूला दुखापत
India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेश यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे.
Ind vs Ban: दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध 280 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. बांगलादेशसमोर 515 धावांचे मोठे लक्ष्य होते, पण धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 234 धावांवर गारद झाला. या विजयासह भारतीय संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
भारत आणि बांगलादेश यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर रोजी सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधी बांगलादेशला एक मोठा धक्का बसला आहे. भारताविरुद्ध चेन्नई येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी करताना शाकिब अल हसनच्या (Shakib Al Hasan) बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातून शाकिब अल हसन बाहेर पडू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शाकिबबाबत अद्याप निर्णय नाही-
जसप्रीत बुमराहच्या चेंडूने शाकिबला दुखापत झाली आणि त्याला उपचारांची गरज आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डातील निवड समितीचे सदस्य हन्नान सरकार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'आम्ही उद्या (मंगळवारी) कानपूरला जाणार आहोत आणि आज विश्रांतीचा दिवस आहे. यानंतर आमची दोन सत्रे होतील आणि त्यानंतर कानपूर कसोटीत शाकिबच्या उपलब्धतेबाबत आम्ही निर्णय घेऊ. आम्हाला अजून कोणताही निर्णय घ्यायचा नाही. या दोन दिवसांत फिजिओने शाकिबला निरीक्षणाखाली ठेवले आहे. आम्ही मैदानात परतल्यावर फिजिओचे मत घेऊ. पुढील सामन्यासाठी शाकिबची निवड करण्यापूर्वी आम्हाला विचार करावा लागेल, अशी माहिती हन्नान सरकार यांनी दिली.
WTC च्या गुणतालिकेत टीम इंडिया अव्वल-
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ-
संबंधित बातमी:
वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo
WTC च्या फायनलसाठी टीम इंडियाचा दावा मजबूत; पहिलं स्थान कायम, पुन्हा ऑस्ट्रेलिया नशिबी येणार?