फ्लाईंग किंग ! विराट कोहलीचा अफलातून झेल, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Kohli Stunning Catch Viral: पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला.

Kohli Stunning Catch Viral: पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीला फलंदाजीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीनं घेतलेल्या अफलातून झेलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. शाकीब अल हसनचा हवेत झेपवत विराटनं घेतलेल्या झेलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान 24 व्या षटकात विराट कोहलीनं शाकिबचा अफलातून झेल घेतला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत विराट कोहलीनं घेतलेला झेल पाहू शकता. झेल घेण्यासाठी विराट कोहलीला हवेत झेपवावं लागलं होतं. विराट कोहलीनं हवेत झेपवत एका हातात झेल घेतला. विराट कोहलीचा झेल पाहून भारतीय खेळाडूंसोबत बांगलादेशचे खेळाडू आणि प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले होते.
शाकिबनं केलं होतं विराटला बाद -
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीला शाकिबनं तंबूचा रस्ता दाखवला होता. शाकिबच्या गोलंदाजीवर विराटचा धेल कर्णधार लिट्टन दासने घेतला होता. विराट कोहलीला 15 चेंडूत फक्त 09 धावा करता आल्या. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीनं शाकिबचा झेल घेत हिशोब चुकता केला. शाकिब अल हसन 29 धावांवर बाद झाला. विराट कोहलीनं शाकिबचा घेतलेला अफलातून झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..
पाहा व्हायरल व्हिडीओ
Virat Kohli magic#ViratKohli𓃵 #INDvsBAN #ViratKohli pic.twitter.com/2bI9d5vaMV
— Rahul Sisodia (@Sisodia19Rahul) December 4, 2022
What an athlete Virat Kohli is. Simply stunningpic.twitter.com/ohVb46B8pl
— Ratnadeep (@_ratna_deep) December 4, 2022
Simply brilliant from Virat Kohli. pic.twitter.com/CEkokAhchH
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 4, 2022
Virat Kohli with a screamer to dismiss Shakib Al Hasan😮
— CricTracker (@Cricketracker) December 4, 2022
📸: Disney + Hotstar pic.twitter.com/Voc5D2w1KN
Stunning catch by Virat Kohli 🔥#BANvIND #INDvsBAN pic.twitter.com/nBbuPt1iqM
— RVCJ Media (@RVCJ_FB) December 4, 2022
सामन्याचा लेखाजोखा -
केएल राहुलच्या अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना फक्त 186 धावा केल्या. राहुलचा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने पाच विकेट्स घेतल्या. भारताने दिलेले 187 धावांचे आव्हान पार करताना बांगलादेशची अवस्था बिकट झाली होती. पण मेंहदी हसन आणि मुस्तफिजूर यांनी दहाव्या विकेट्ससाठी अर्धशतकी भागिदारी करत बांगलादेशला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
