एक्स्प्लोर

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेत 'या' पाच भारतीय खेळाडूंवर असेल सर्वांची नजर!

Team India : भारतीय आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन T20 सामने खेळवले जाणार 20 ते 25 सप्टेंबर रोजी होणारे हे सामने टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची रंगीत तालीम असणार आहे. 

IND vs AUS T20 Series : भारतीय संघ आगामी आयसीसी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022) खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पण त्यापूर्वी भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी20 मालिका खेळणार असून ही टीम इंडियाची एकप्रकारे रंगीत तालिम असणार आहे. दरम्यान भारत ऑस्ट्रेलिया या टी20 सामन्यावेळी काही खेळाडूंवर सर्व क्रिकेट जगताच्या खासकरुन भारतीय चाहत्यांचा नजरा असतील, हे खेळाडू कोणते ते पाहूया....

विराट कोहली

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने आशिया चषक 2022 मध्ये शानदार कामगिरी केली होती. विराटने आशिया कप 2022 च्या 5 सामन्यात 276 धावा केल्या. यावेळी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटनं 61 चेंडूत 122 धावांची शानदार खेळी करत शतकांचा दुष्काळही संपवला. खरंतर विराट कोहली फॉर्मात आल्यानंतर भारतीय संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे, पण तरी त्याचा हा फॉर्म विश्वचषकातही असाच राहतो का हे पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. 

जसप्रीत बुमराह

भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियाचा भाग नव्हता. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया कप 2022 स्पर्धाची खेळू शकला नाही. परंतु आता बुमराह पूर्णपणे फिट असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत मैदानात उतरेल. बुमराह संघाचा मुख्य गोलंदाज असल्याने सर्वांच्याच नजरा त्याच्यावर असणार आहेत.

हर्षल पटेल

बुमराहसोबतच दुखापतीतून सावरुन पुन्हा संघात एन्ट्री करणाऱ्या हर्षलवरही साऱ्यांच्या नजरा असतील. स्लोवर बॉल किंग असणारा हर्षल डेथ ओव्हर्समध्ये आयपीएलमध्ये चमकल्याने भारतीय संघासाठी विश्वचषकातही तो अशीच कामगिरी करेल अशी आशा आहे. त्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची असेल.

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये मागील काही महिन्यांत प्रभावी खेळ केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शतक झळकावल्यानंतर त्याने आशिया कप 2022 मध्येही चांगली कामगिरी केली. ज्यामुळे सूर्या आता आयसीसी टी20 रँकिंगमध्येही टॉप 5 मध्ये आहे. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत आपले कर्तृत्व दाखवण्यासाठी सूर्या सज्ज झाला असून त्यामुळे त्याच्याकडे सर्वांच्या नजरा असतील.

मोहम्मद शमी

मोहम्मद शमीची 2022 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. तेव्हापासून अनेकजण याबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधी मोहम्मद शमीची आशिया कपसाठीही भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र, मोहम्मद शमी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाचा भाग असल्याने यावेळी तो कशी कामगिरी करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिकेसाठी भारतीय संघ - 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, दीपक चाहर. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रियाVinod Tawde Virar : विरारमध्ये तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; राजन नाईक, क्षितीज ठाकूरांमध्ये वादHitendra Thakur On Vinod Tawde : 'भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी घेऊन येतायत'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget