![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ind vs Aus, LIVE Score Updates : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 6 विकेटच्या बदल्यात 233 धावा
India vs Australia Adelaide Test Live Score updates : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतली पहिला डे-नाईट सामना आजपासून एडिलेडवर सुुरु होत आहे. भारतासाठी खेळाचं हे नवं स्वरुप अतिशय नवखं आहे, त्यामुळंच ऑस्ट्रेलियाचा संघ इथं अधिक भक्कम स्थानी दिसत आहे. पण तरी देखील एडिलेडमध्ये भारतीय संघानं केलेलं प्रदर्शन पाहता ही संघासाठी जमेची बाजू ठरु शकते.
LIVE
![Ind vs Aus, LIVE Score Updates : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 6 विकेटच्या बदल्यात 233 धावा Ind vs Aus, LIVE Score Updates : पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या 6 विकेटच्या बदल्यात 233 धावा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/17161739/IND-vs-AUS.jpeg)
Background
India VS Australia : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) कसोटी (test) सामन्यांची सुरुवात गुरुवारपासून एडिलेड ओवल मैदानात डे- नाईट कसोटीनं होत आहे. भारतासाठी खेळाचं हे नवं स्वरुप अतिशय नवखं आहे, त्यामुळंच ऑस्ट्रेलियाचा संघ इथं अधिक भक्कम स्थानी दिसत आहे. डे- नाईट टेस्टबाबत सांगावं तर, या स्वरुपात ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वात अनुभवी आहे. आतापर्य़ंत या संघानं 7 डे- नाईट कसोटी सामने खेळले आहेत. ज्यापैकी चार सामने एडिलेड ओवलमध्येच खेळले गेले आहेत. तर, भारतीय क्रिकेट संघानं मात्र आतापर्यंत अशा प्रकारचा एकच सामना खेळला आहे.
एडिलेडमध्ये भारतीय संघानं केलेलं प्रदर्शन पाहता ही संघासाठी जमेची बाजू ठरु शकते. 2018-2019 च्या दौऱ्यात भारतीय संघानं एडिलेडमध्ये विजयी प्रदर्शन केलं होतं. भारतीय संघानं दुसरा सराव सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंड येथे ‘पिंक बॉल’नं खेळला होता. या सामन्यात संघातील आघाडीचे खेळाडू कोहली, चेतेश्वर पुजारा, रविचंद्रन अश्विन, रिद्धिमान साहा आणि उमेश यादव सहभगी नव्हते. पण, या सर्वच खेळाडूंना एडिलेड टेस्टसाठी भारतीय संघातील अंतिम प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे.
सलग तीन दिवस सातत्यानं रात्रीच्या वेळी सेंटर विकेटवर सराव केल्याचा आपल्या संघाला फायदाच होणार आहे, असं ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टिम पेन यानं स्पष्ट केलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून अंतिम प्लेइंग 11 ची निवड करण्यात आली असली, तरीही याची घोषणा मात्र अद्यापही करण्यात आलेली नाही. तर, भारतीय संघानं प्लेइंग 11 जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)