India Tour of England : इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाला दुखापतीने ग्रासलं, 2 खेळाडू तातडीने बदलले, आयुष म्हात्रेच्या टीममध्ये फेरबदल!
भारतीय कसोटी संघ 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे, तर भारतीय 19 वर्षांखालील संघ 24 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर पहिला सामना खेळणार आहे.

India U19 Squad for Tour of England Update : भारतीय कसोटी संघ 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे, तर भारतीय 19 वर्षांखालील संघ 24 जून रोजी इंग्लंड दौऱ्यावर पहिला सामना खेळणार आहे. या दौऱ्यापूर्वी, भारतीय 19 वर्षांखालील संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण संघातील 2 खेळाडू जखमी झाले आहेत. हे खेळाडू आदित्य राणा (Aditya Rana) आणि खिलन पटेल आहेत. दोन्ही खेळाडूं इंग्लंड दौऱ्यातून बाहेर गेले आहेत आणि त्यांच्या जागी खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे.
ज्युनियर क्रिकेट समितीने आगामी भारत 19 वर्षांखालील इंग्लंड दौऱ्यासाठी आदित्य राणा आणि खिलन पटेल यांच्या जागी डी दीपेश (D-Deepesh) आणि नमन पुष्पक (Naman Pushpak) यांचा संघात समावेश केला आहे. दीपेश आणि नमन दोघांनाही या दौऱ्यासाठी स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू असलेल्या कॅम्प दरम्यान आदित्यला पाठीच्या कण्यातील स्ट्रेस फ्रॅक्चर झाला, तर खिलनच्या उजव्या पायात समस्या आहे. अशा परिस्थितीत, बीसीसीआयला दोन्ही खेळाडूंच्या बदलीची घोषणा करावी लागली आहे.
🚨 NEWS 🚨
— BCCI (@BCCI) June 16, 2025
India U19 Squad for Tour of England: Injury and Replacement Updates
Details 🔽 #TeamIndiahttps://t.co/QUoyh7ymij
आयुष म्हात्रे संघाचा कर्णधार...
बीसीसीआयने 22 मे रोजीच इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर-19 संघाची घोषणा केली होती. संघाची कमान आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली होती, तर आयपीएल 2025 मध्ये फलंदाजीने धुमाकूळ घालणारा वैभव सूर्यवंशी याचाही संघात समावेश करण्यात आला होता. आता दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधी संघात बदल करण्यात आला आहे.
भारताच्या गोलंदाजी आक्रमणात प्रणव राघवेंद्रसारखे गोलंदाज आहेत, ज्यांनी बंगळुरू येथील एनसीए कॅम्प दरम्यान 147 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धी मिळवली होती. दुसरीकडे, इंग्लंड लायन्सने देखील एक मजबूत संघ निवडला आहे, ज्यामध्ये इंग्लंडचा माजी स्टार अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकी फ्लिंटॉफचा समावेश आहे.
नवीन अपडेट भारतीय अंडर 19 संघ -
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार), हरवंश सिंग, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, हेनिल पटेल, युधावना मोहम्मद, युधावना, प्रमोदकुमार, युवराज सिंह सिंग, डी. दीपेश, नमन पुष्पक.
हे ही वाचा -





















