एक्स्प्लोर

कुणाला संधी, कुणाचा पत्ता कट, विश्वचषकासाठी 15 शिलेदारांची निवड आज

World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 शिलेदारांची निवड होणार आहे. निवड

India ODI World Cup Squad 2023 : विश्वचषकासाठी आज भारताच्या 15 शिलेदारांची निवड होणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम 15 खेळाडूंची नावे निश्चित केली आहेत. आज दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषदेत घेऊन अजित आगरकर सघाची घोषणा करणार आहेत. अजित आगरकर श्रीलंकेतच आहेत. तेथून ते पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करणार आहे. 15 जणांमध्ये कुणाला संधी मिळणार? याकडे भारतीय क्रीडा प्रेमींचं लक्ष लागलेय. 

5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाचा पहिला सामना रंगणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी अखेरचा सामना रंगणार आहे. भारतीय संघ आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याने होणार आहे. हा सामना चेन्नई येथे रंगणार आहे. विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड आज ( 5 सप्टेंबर ) रोजी होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 15 जणांच्या संघात कुणाला संधी मिळणार... हे जवळपास निश्चित झालेय. विश्वचषकासाठी निवडल्या जाणाऱ्या संघामध्ये आशिया चषकात खेळत असलेल्या खेळाडूंचीच निवड होणार आहे. रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल. त्याशिवाय विराट कोहली,  जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, ईशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांची नावे निश्चित आहे. 

अजित आगरकर यांच्या नेतृत्वातील निवड समिती काही आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकते. पण रिपोर्ट्सनुसार, आशिया चषकात खेळणाऱ्या संघातीलच खेळाडू निश्चित झाले आहे. आयसीसीच्या नियमांनुसार, विश्वचषकासाठी संघ निवड करण्याची अखेरची तारीख पाच सप्टेंबर आहे. 27 सप्टेंबर पर्यंत संघात बदल केले जाऊ शकतात.  भारतासाठी जमेची बाजू म्हणजे, केएल राहुल फिट झालाय. एनसीएमधील मेडिकल टीमने केएल राहुल तंदुरुस्त झाल्याचे जाहीर केले आहे. 

केएल राहुल तंदुरुस्त - 
विकेटकीपर फलंदाज केएल राहुल याने फिटनेस चाचणी पास केली आहे. केएल राहुल आज, मंगळवारी श्रीलंकेत दाखल होणार असून भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. टीम इंडियाच्या सुपर 4 मधील सामन्यांसाठी राहुल उपलब्ध असेल. दुखापतीमुळे केएल राहुल आशिया चषखातील पहिल्या दोन सामन्याला उपलब्ध नव्हता. बेंगलोर येथे एनसीएमध्ये केएल राहुल याने फिटनेसवर काम केले. सोमवारी केएल राहुलने फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली. राहुल दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. विश्वचषकासाठी राहुल उपल्बध असेल. त्याची निवडही निश्चित मानली जात आहे. 

2023 वनडे वर्ल्ड कपसाठी भारताचे संभावित 15 शिलेदार - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (रिजर्व विकेटीकपर), हार्दिक पांड्या (उपकप्तान), रविंद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह. 

Rohit Sharma (Captain), Hardik Pandya (vice-captain), Shubman Gill, Virat Kohli, Shreyas Iyer, KL Rahul, Ravindra Jadeja, Shardul Thakur, Jasprit Bumrah, Mohammed Siraj, Kuldeep Yadav, Mohammed Shami, Axar Patel, Ishan Kishan, Suryakumar Yadav. 

5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या रनसंग्रामाला सुरुवात होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकातील पहिला सामना रंगणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. 8 ऑक्टोबरपासून भारत आपल्या विश्वचषकाच्या अभियानाला सुरुवात करणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : कचऱ्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-भाजपमध्ये वार-पलटवार, कोण मारणार बाजी
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2025 | बुधवार 
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
मोठी बातमी! मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांचे नाव का नाही? हायकोर्टाचा राज्य सरकारला थेट सवाल
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
Embed widget