IND vs Oman Asia Cup 2025 : 7 दिवसांत 4 सामने, सुर्याच्या डोक्यात कोणाता प्लॅन?, बुमराहला विश्रांती, अर्शदीप-हर्षित राणाला संधी? जाणून घ्या कोण IN, कोण OUT
India playing XI vs Oman : आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने ग्रुप अ मध्ये त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून सुपर फोरमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.

IND vs Oman Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाने ग्रुप अ मध्ये त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने जिंकून सुपर फोरमध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमध्ये अजूनही एक सामना शिल्लक आहे, ज्यामध्ये त्यांचा सामना 19 सप्टेंबर रोजी ओमानशी होईल. भारतीय संघाने स्पर्धेत त्यांचे दोन्ही सुरुवातीचे सामने दुबई क्रिकेट स्टेडियमवर खेळले असले तरी, ओमानविरुद्धचा पुढील सामना अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर खेळला जाईल. रविवारी होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्याआधी ओमानविरुद्ध बॅट्समनना खेळण्यासाठी संधी द्यायची आहे. याआधी UAE आणि पाकिस्तानविरुद्धचे छोटे टार्गेट्स टीमने निवांत गाठलेत होते.
7 दिवसांत 4 सामने, सुर्याच्या डोक्यात कोणाता प्लॅन?
अभिषेक शर्मा झकास सुरुवात देतोय, पण शुभमन गिलने क्रीजवर वेळ द्यायला हवा. कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानविरुद्ध चांगली खेळ केलाय, पण तिलक वर्माला अजून थोडं जास्त बॅटिंग मिळणं गरजेचं आहे. इंडिया जर फायनलला पोचली, तर 7 दिवसांत 4 सामने खेळावे लागतील. त्यामुळे हार्दिक पंड्या, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि अक्षर पटेललासुद्धा बॅटिंगची संधी द्यायची आहे.
बॉलिंग तर एवढी टॉप आहे की ओमान जर पहिल्यांदा बॅटिंगला आला, तर सामना झटक्यात संपेल. जतिंदर सिंगची टीम कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्तीला खेळून काढेल, अशी शक्यता फारच कमी आहे.
ओमान संघातील खेळाडूंची कामगिरी
ओमानचा परफॉर्मन्स पाकिस्तान आणि UAE विरुद्ध पाहिला तर दोन सामन्यांत एकाही खेळाडूने 30 चा स्कोर पार केलेला नाही. पाकिस्तानविरुद्ध हम्माद मिर्झा 27 धावा, तर UAE विरुद्ध आर्यन बिष्टने 32 बॉलमध्ये 24 धावा काढल्या हेच त्यांचे टॉप स्कोर्स आहेत.
सुर्याच्या डोक्यात कोणाता प्लॅन?
टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर फारसे प्रयोग करायला इच्छुक नाही. पण सुपर-4 आधी जसप्रीत बुमराहला थोडा आराम दिला जाऊ शकतो. बुमराह स्वतः ब्रेक घ्यायच्या मूडमध्ये नाहीये, पण बेस्ट पेसरबाबत काळजी घेणं आलंच. त्यामुळे अर्शदीप सिंगला संधी मिळू शकेल. तसेच वरुण किंवा कुलदीपला विश्रांती देऊन हर्षित राणालासुद्धा खेळवला जाऊ शकतो. सूर्यकुमार आपला बॅटिंग ऑर्डर थोडा बदल करू शकतो.
भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
ओमानचा संघ : जतिंदर सिंग (कर्णधार), हम्माद मिर्झा, विनायक शुक्ला, सुफयान युसूफ, आशिष ओडेदेरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफयान महमूद, आर्यन बिश्त, करण सोनावले, झिकारिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैसल शाह, मोहम्मद इम्रान, नदीम खान, शकील अहमद, समय श्रीवास्तव.
हे ही वाचा -
















