Ind vs Pak Asia Cup 2025 : हस्तांदोलन टाळल्यानंतर पाकिस्तानचे सर्व दिग्गज चवताळले; आता थेट मॅच रेफरी फिक्सर असल्याचा केला दावा, सूर्यकुमारवरही मोठं विधान
रमीझ राजा याने बुधवारी एकदम वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याने सरळ सरळ सामनाधिकारी अँडी पॉयक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांना भारताचा कायमचा फिक्सर ठरवलं.

Ind vs Pak Asia Cup 2025 Handshake Controversy : रमीझ राजा याने बुधवारी एकदम वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याने सरळ सरळ सामनाधिकारी अँडी पॉयक्रॉफ्ट (Andy Pycroft) यांना भारताचा कायमचा फिक्सर ठरवलं. तो म्हणाला की, पॉयक्रॉफ्ट भारताच्या प्रत्येक सामन्यात हजर असतात. एवढंच नाही तर खोटं दावे करत त्याने सूर्यकुमार यादववरसुद्धा टीका करू लागला. हे सगळं तेव्हा झालं, जेव्हा पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं सांगितलं होतं की सामनाधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे. खरं तर भारतीय खेळाडूंनी हात मिळवायला नकार दिल्यानं जी बेइज्जती झाली, त्याचं ओझं पाकिस्ताननं रेफरीवर टाकलं.
पीसीबीनं आधी पॉयक्रॉफ्ट यांना आशिया कपमधून हाकलून द्या अशी मागणी केली, पण आयसीसिनं सरळ नकार दिला. मग निदान पाकिस्तानच्या सामन्यांत तरी दुसरा रेफरी द्या असं म्हणाले, पण ती मागणीही फेटाळली गेली. शेवटी पाकिस्तान-यूएईच्या सामन्यातही पॉयक्रॉफ्टच रेफरी होते. ही सततची बेइज्जती झाकायला पाकिस्तान बोर्डानं रेफरीनं माफी मागितली असं सांगितलं. पण पीसीबी मुख्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना रमिझ राजानी पॉयक्रॉफ्टला थेट भारताचा फिक्सर असल्याचं म्हटलं.
रमीझ राजा काय म्हणाला? (What did say Ramiz Raja?)
रमीझ राजा म्हणाला, "मजेशीर गोष्ट आहे. माझा अंदाज असा आहे की जेव्हा जेव्हा अँडी पॉयक्रॉफ्ट असतात, तेव्हा भारताचा सामना असतो. तो भारताचा लाडका आहे. मी जेव्हा कधी टॉसला गेलो, तेव्हा मला जाणवलं की भारतासाठी पॉयक्रॉफ्ट कायमस्वरूपी फिक्सर आहे. आत्ताच आम्ही आकडेवारीवर बोलत होतो, तब्बल 90 वेळा भारताच्या सामन्यांत तो रेफरी राहिला आहे. हे फारच एकतर्फं आहे. अशा गोष्टी घडायला नकोत, कारण हा न्यूट्रल प्लॅटफॉर्म आहे, म्हणूनच मॅच रेफरी असतात. पण मला वाटतं की भारताच्या प्रत्येक सामन्यासाठी यालाच लावतात."
सूर्यकुमार यादववरही मोठं विधान (Ramiz Raja statement on Suryakumar Yadav)
हे बोलताना बाजूलाच बसलेला पीसीबी चीफ आणि एसीसी प्रमुख मोहसिन नकवी सतत हसत होते. पण रमीझ इथे थांबला नाही, त्याने आपल्या वक्तव्यात सूर्यकुमार यादवचं नावसुद्धा ओढलं. तो पुढे म्हणाला, "ही फार नाजूक परिस्थिती होती. भावना खूप टोकाला गेल्या होत्या. मला आनंद आहे की आम्ही भावनेच्या भरात काही चुकीचा निर्णय घेतला नाही. जर बहिष्कार केला असता तर आमच्या क्रिकेटचं नुकसान झालं असतं. पण माझी सगळ्यात मोठी हरकत होती ती सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने केलेल्या वक्तव्यांवर... जर त्याने खरंच माफी मागितली असेल तर चांगली गोष्ट आहे."
पण रमीझ राजा नेहमीप्रमाणे खोटं बोललाच. त्याने दिलेली आकडेवारीच चुकीची होती. खरा हिशोब असा आहे की अँडी पॉयक्रॉफ्ट भारताच्या 124 सामन्यांत रेफरी राहिला आहे. पण पाकिस्तानच्या 103 सामन्यांतही त्यानेच रेफरीची भूमिका निभावली आहे. एवढंच नाही, तर इंग्लंडच्या 107 सामन्यांतही तो रेफरी होता.
आता भारत–पाक सामना कधी अन् केव्हा रंगणार? (When is the next India-Pakistan match in Asia Cup 2025)
ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान दोघांनीही आशिया कप 2025 च्या सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे. आता दोन्ही संघ पुन्हा रविवार, 21 सप्टेंबर रोजी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केला जाणार असून, सोनी लिव अॅप लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
हे ही वाचा -





















