(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WI vs IND: भारताला मिळाला केएल राहुलच्या तोडीचा फलंदाज, एकदिवसीय मालिकेत गाजवलंय मैदान!
WI vs IND: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना केएल राहुलच्या दुखापतीनं भारताच्या (Team India) अडचणीत भर टाकली आहे.
WI vs IND: भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाच्या (Ravindra Jadeja) दुखापतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना भारताच्या (Team India) अडचणीत भर पडणारी माहिती समोर आली. भारताचा सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेतून बाहेर झाला. त्याच्या जागी भारताचा युवा यष्टीरक्षक संजू सॅमसनला (Sanju Samson) संघात स्थान देण्यात आलंय.
एकदिवसीय मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना आज त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, शिखर धवनच्या नेतृत्वात भारतानं एकदिवसीय मालिकेत 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलंय आहे. संजू सॅमसनची एकदिवसीय मालिकेत निवड झाली होती. मात्र, टी-20 संघात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. परंतु, केएल राहुलच्या दुखापतीमुळं त्याला वेस्ट इंडीजविरुद्ध टी-20 मालिकेत स्थान देण्यात आलंय.
केएल राहुलला विश्रांती सल्ला
केएल राहुलनं नुकतीच जर्मनीमध्ये पाठीच्या दुखापतीवर सर्जरी केली होती. दुखापतीवर मात केल्यानंतर त्याला कोरोनानं घेरलं. त्यानंतर त्यानं कोरोनावरही मात केली. परंतु, बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमनं त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय. कोरोनातून बरा झाल्यानंतर केएल राहुलला अशक्तपणा जाणवत असल्याची माहिती समोर आलीय.
भारताचा टी-20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवींद्रचंद्र अश्विन, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
वेस्ट इंडीजचा टी-20 संघ
निकोलस पूरन (कर्णधार), शामराह ब्रूक्स, ब्रेंडन किंग, कायले मायर्स, रोवमन पॉवेल (उपकर्णधार), डोमेनिक ड्रेक्स, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, जेसन होल्डर, ओबेद मेकॉय, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, शिमरन हेटमायर, किमो पॉल, हेडन वॉल्श, डेवॉन थॉमस.
हे देखील वाचा-
- CWG 2022: भारतीय संघापुढं बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान, पाहा दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची कामगिरी
- WI vs IND 1st T20: जाडेजाची दुखापत चिंता वाढवणारी, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळणार संधी?
- WI vs IND T20: भारताविरुद्ध टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ जाहीर, स्फोटक फलंदाजांचं संघात कमबॅक