IND vs BAN : भारताची विश्वचषकाची दमदार सुरुवात, पंत-पांड्या चमकले, गोलंदाजांचाही भेदक मारा
IND vs BAN Match Report : भारतीय संघाने विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 62 धावांनी दारुण पराभव केला.
IND vs BAN Match Report : भारतीय संघाने विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली आहे. सराव सामन्यात भारताने बांगलादेशचा 60 धावांनी दारुण पराभव केला. नजमुल हसन शंतोच्या नेतृत्वातील बांगलादेशल सराव सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्या, ऋषभ पंत यांनी फलंदाजीत अमुलाग्र योगदान दिलं. तर गोलंदाजीत शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह यांनी जलवा दाखवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर 183 धावांचे आव्हान दिले होते. पण भारताच्या भेदक माऱ्यासमोर बांगलादेशचा संघ आठ विकेटच्या मोबदल्यात 122 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
बांगलादेशकडून महमुदुल्लाहने 28 चेंडूत 40 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर शाकीब अल हसनने 34 चेंडूत 28 धावा केल्या. याशिवाय सौम्या सरकार, तनजीद हसनलिटन दास. नजमुल हसन शांतौ आणि तौहीद हृदय या फलंदाजांनी निराशा केली. भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला. अर्शदीप सिंग आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
शाकीब अल हसन आणि महमदुल्लाह शानदार खेळले, पण....
भारताने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर सौम्या सरकार एकही धाव न काढता बाद झाला. बांगलादेशचे आघाडीचे तीन फलंदाज 10 धावांतच तंबूत परतले होते. तर 39 धावांवर बांगलादेशला चौथा धक्का बसला होता. बांगलादेशच्या फलंदाजांनी एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या 42 धावांत बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत परतला होता. मात्र यानंतर शाकीब अल हसन आणि महमुदुल्लाह यांनी डाव सावरला. दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली. महमुदुल्लाहने 28 चेंडूत 340 धावा केल्या, तर शाकीब अल हसनने 34 चेंडूत 28 धावा केल्या, पण बांगलादेशला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. बांगलादेशला 62 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
All smiles in New York as #TeamIndia complete a 60-run win in the warmup clash against Bangladesh 👏👏
— BCCI (@BCCI) June 1, 2024
Scorecard ▶️ https://t.co/EmJRUPmJyn#T20WorldCup pic.twitter.com/kIAELmpYIh
भारताकडून ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या चमकले
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन स्वस्तात तंबूत परतल. पण पंतने डावाला आकार दिला. ऋषभ पंत याने बांगलादेशच्या गोलंदाजांची पिटाई केली. पंत याने अवघ्या 32 चेंडूत 53 धावांची खेळी केली. पंत याने आपल्य या वादळी खेळीमध्ये चार षटकार आणि चार चौकर ठोकले. पंतने 166 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याने फटकेबाजी केली. पांड्याने 23 चेंडूमध्ये 40 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये पांड्याने चार षटकार आणि दोन चौकार ठोकले. पांड्याने वादळी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. त्याने 174 च्या स्ट्राईक रेटने बांगलादेशच्या गोलंदाजांची धुलाई केली. पांड्याने लागोपाठ तीन षटकार ठोकत आपण फॉर्मत परतल्याची हिंट दिली. सूर्यकुमार यादवने 18 चेंडूत 31 धावांची खेळी केली.