ऋतुराजचं अर्धशतक एका धावेनं हुकलं, टीम इंडियाचं झिम्बाब्वेसमोर 183 धावांचे आव्हान
IND vs ZIM : तिसऱ्या टी20 सामन्यातभारताने झिम्बाब्वेविरोधात निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारलाय.
IND vs ZIM : तिसऱ्या टी20 सामन्यातभारताने झिम्बाब्वेविरोधात निर्धारित 20 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 182 धावांचा डोंगर उभारलाय. भारताकडून कर्णधार शुभमन गिल यानं शानादर अर्धशतक ठोकले. तर ऋतुराज गायकवाडचे अर्धशतक अवघ्या एका धावेनं हुकले. यशस्वी जैस्वाल यानेही निर्णायक 36 धावांची खेळी केली. झिम्बाब्वेला विजयासाठी 183 धावांचे आव्हान मिळाले आहे. पाच सामन्याची टी20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पहिला सामना झिम्बाब्वे जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली होती.
टीम इंडियासाठी कर्णधार शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. शुभमन गिल याने 49 चेंडूत 66 धावांचा पाऊस पाडला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी फिल्डिंग अतिशय खराब केली. त्यामुळे टीम इंडियाला 20-25 धावा अतिरिक्त काढता आल्या. यजमान झिम्बाब्वे संघाकडून कर्णधार सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.
भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी 67 धावांची भागीदारी करून टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली. जैस्वाल या मालिकेतील पहिला सामना खेळत होता, त्याने 27 चेंडूत 36 धावा केल्या. तर दुसऱ्या सामन्याचा शतकवीर अभिषेक शर्मा आज काही विशेष करू शकला नाही. त्याने 9 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 28 चेंडूत 49 धावा केल्या. गायकवाडचे आपल्या T20 कारकिर्दीतील 5 वे अर्धशतक हुकवले पण संघाला 182 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले.
12 षटकांपर्यंत टीम इंडियाची धावसंख्या फक्त 127 इतकी होती. त्यात 16 व्या षटकात फक्त तीन धावाच आल्या. पण अखेरच्या चार षटकात टीम इंडियाच्या शिलेदारांनी वादळी फलंदाजी करत 52 धावा वसूल केल्या. सिकंदर रझाच्या अखेरच्या षटकात 18 धावा वसूल केल्या. अखेरच्या दोन षटकात 28 धावांचा पाऊस पाडला. अखेरच्या चार षटकात भारतीय खेळाडूंनी तीन षटकार आणि चार चौकार ठोकले. अखेरच्या चार षटकात भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि संजू सॅमसन यांनी धावांचा पाऊस पाडला. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझा आणि ब्लेसिंग मुजराबानी यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. इतर सर्व गोलंदाजांची विकेटची पाटी कोरीच राहिली.
दोन्ही संघाची प्लेईंग 11
भारताची प्लेईंग 11 - यशस्वी जायसवाल, अभिषेक शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद
झिम्बाब्वेची प्लेईंग 11 - ताडीवनशे मरुमानी, वेसली मधेवेरे, ब्रायन बॅनेट, डियोन मायर्स, सिकंदर रजा (कर्णधार), जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव मडांडे, वेलिंगटन मसाकादजा, रिचर्ड गरावा, ब्लेसिंग मुजरबानी, तेंदई चतारा