एक्स्प्लोर

IND vs ZIM : संजू, यशस्वी अन् शिवम झिम्बॉब्वेत दाखल, तिसऱ्या टी 20 मध्ये शुभमन गिल कुणाला संधी देणार? कोण बाहेर?

IND vs ZIM : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना उद्या होणार आहे. या मॅचमध्ये कुणाला संधी द्यायचा असा प्रश्न शुभमन गिल समोर आहे.

हरारे : भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील तिसरा सामना उद्या होणार आहे. टीम इंडियाचे खेळाडू संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे झिम्बॉब्वेत दाखल झाले आहेत.  टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारतानं विजेतेपद मिळवल्यानंतर  संघ बारबाडोसमध्ये अडकून पडला होता. यामुळं संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे हे देखील अडकून पडले होते. भारतात दाखल झाल्यानंतर विजय परेडमध्ये सहभाग घेतल्यानंतर हे तिघे झिम्बॉब्वेत दाखल झाले आहेत. झिम्बॉब्वेनं पहिल्या मॅचमध्ये भारताला 13 धावांनी पराभूत केलं. तर, दुसऱ्या मॅचमध्ये भारतानं कमबॅक करत 100 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या मॅचमध्ये अभिषेक शर्मानं दमदार कामगिरी करत 100 धावा केल्या होत्या. 

शुभमन गिल समोर पेच?

यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, संजू सॅमसन यांना झिम्बॉब्वेत पोहोचण्यास उशीर होत असल्यानं टीम इंडियानं पर्यायी व्यवस्था केली होती. अभिषेक शर्मानं पहिल्या दोन मॅचमध्ये शुभमन गिल सोबत डावाची सुरुवात केली होती. अभिषेक शर्माला पहिल्या मॅचमध्ये खातं उघडण्यात अपयश आलं तर दुसऱ्या मॅचमध्ये त्यानं 7 चौकार आणि 8 षटकारांच्या जोरावर त्यानं 46 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.  आता यशस्वी जयस्वाल झिम्बॉब्वेत दाखल झाल्यानं कुणाला संधी द्यायची असा प्रश्न शुभमन गिल समोर निर्माण झालाय.

संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेला संधी मिळाल्यास कोण बाहेर जाणार?

संजू सॅमसनला शुभमन गिलनं संघात स्थान दिल्यास  ध्रुव जुरेलला संघाबाहेर जावं लागणार आहे. ध्रुव जुरेलनं पहिल्या दोन टी 20 मॅचेसमध्ये स्थान मिळालं होतं. शिवम दुबेला संघात स्थान मिळाल्यास साई सुदर्शनला संघाबाहेर जावं लागू शकतं. यशस्वी जयस्वालला संघात संधी दिली गेल्यास अभिषेक शर्माला संघाबाहेर जावं लागू शकतं. 

शुभमन गिल तिसऱ्या टी 20  मॅचमध्ये गोलंदाजांमध्ये कोणताही बदल करण्याची शक्यता नाही. आवेश खान आणि मुकेश कुमार चांगली गोलंदाजी करत आहेत. रवि बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी देखील प्रभावी गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळं शुभमन गिल कोणताही बदल करण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये विजय मिळवून कोणता संघ आघाडी घेणार ते पाहावं लागेल. भारत आघाडी घेणार की झिम्बॉब्वे पलटवार करणार हे पाहावं लागेल. झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांनी पहिल्या टी 20 मॅचमध्ये दमदार कामगिरी केली होती. 

संबंधित बातम्या :

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह अन् स्मृती मानधनाला आयसीसीकडून मानाचं पान, मोठी अपडेट समोर, बुमराहनं मानले आभार

वनडे वर्ल्ड कपमधील दुखापत, आयपीएलचं अपयश ते टी 20 वर्ल्डकपमधील विजय, हार्दिकनं सगळं सांगितलं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget