एक्स्प्लोर
IND vs ZIM, 1st ODI Result : भारताचा झिम्बाब्वेवर 10 विकेट्सनी मोठा विजय, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
IND vs ZIM, Match Highlights : भारत सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असून पहिल्या एकदिवसीय सामन्यात आधी उत्तम गोलंदाजी आणि नंतर दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने 10 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
IND vs ZIM : भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत 10 विकेट्सनी जिंकला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने प्रथम गोलंदाजी घेतली. ज्यानंतर 189 धावांवर झिम्बाब्वेला रोखत, भारताने हे लक्ष केवळ 30.5 षटकात पूर्ण करत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आधी दीपक, अक्षर आणि प्रसिध यांच्या भेदक गोलंदाजीनंतर सलामीवीर शुभमन आणि शिखर दोघांनी अप्रतिम अशी अर्धशतकं झळकावत भारताचा विजय पक्का केला. तर सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवू...
IND vs ZIM 10 महत्त्वाचे मुद्दे-
- सामन्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाणेफेक. आजही नाणेफेक जिंकून भारताने सामना जिंकला आहे. भारताच्या गोलंदाजांसह सलमीवीर गिल आणि शिखरने अप्रतिम फलंदाजी केली.
- सामन्याबद्दल बोलायचं झालं तर सामन्यात भारताने झिम्बाब्वेला 189 धावांवर रोखलं. ज्यामुळे विजयासाठी भारताला 50 षटकात केवळ 190 धावा करायच्या होत्या. शुभमन गिल (नाबाद 82) आणि शिखर धवन (नाबाद 81) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हे आव्हान पूर्ण केलं.
- सामन्यात सर्वप्रथम म्हणजे नाणेफेक जिंकत प्रथम भारताने गोलंदाजी घेतली.
- दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णासह फिरकीपटू अक्षर पटेलच्या भेदक माऱ्यापुढं झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. ज्यामुळं झिम्बाब्वेचा संघ 40.3 षटकात 189 धावांवर ऑलआऊट झाला.
- झिम्बाब्वेकडून कर्णधार रेगीज चकाब्वानं सर्वाधिक 35 धावांची खेळी. रेगीज चकाब्वानंतर रिचर्ड येनगारावा (33 धावा) आणि ब्रॅडली इवांसनं (नाबाद 34 धावा) अखेरिस फटकेबाजी केली.
- 190 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताकडून सलामीवीर शुभमन आणि शिखर या दोघांनी अगदी अप्रतिम अशी सुरुवात भारताला करुन दिली.
- शुभमनने 72 चेंडूत नाबाद 82 तर शिखरने 113 चेंडूत नाबाद 81 धावा केल्या. ज्यामुळे 30.5 षटकातच भारताने 192 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे भारताने 10 गडी राखून विजय मिळवला
- या विजयामुळे भारत मालिकेत 1-0 च्या आघाडीवर पोहोचला आहे.
- सामनावीर म्हणून उत्तम गोलंदाजी करणाऱ्या दीपक चहरला पुरस्कृत करण्यात आलं.
- आता दुसरा सामना शनिवारी 20 ऑगस्ट रोजी पार पडेल.
हे देखील वाचा-
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement