एक्स्प्लोर

Indian Captain : धोनी, कोहली की रोहित शर्मा? सौरव गांगुलीला कोणाचं नेतृत्त्व वाटतं खास? वाचा सविस्तर

Sourav Ganguly : सौरव गांगुली भारतीय क्रिकेटमधील एक यशस्वी कर्णधार असून सध्या तो बीसीसीआय अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहे. 

Sourav Ganguly Statement : भारतीय क्रिकेटमधील एक यशस्वी कर्णधार म्हणून सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचं नाव घेतलं जातं. त्याने भारताला विश्वचषक जिंकवून दिला नसला तरी भारतीय क्रिकेटची दिशा बदलण्यात त्याची मोलाची कामगिरी आहे. सध्या बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या सौरवने भारताचे मागील काही वर्षातील कर्णधार धोनी आणि कोहली तसंच सध्याचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्या नेतृत्त्वाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'महेन्द्र सिंह धोनीचं शानदार नेतृत्व'

सौरव गांगुलीने महेन्द्र सिंह धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलताना धोनीने भारतीय क्रिकेटचं शानदार नेतृत्व केलं अशी खास प्रतिक्रिया दिली आहे. धोनीने 2007 टी20 वर्ल्ड कप तसंच 28 वर्षानंतर 2011 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप भारताला जिंकवून दिला, असं बोलत गांगुलीने धोनीचं कौतुक केलं असून त्याने विराटबद्दलही प्रतिक्रिया दिली आहे. विराटच्या नेतृत्त्वात भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अगदी अप्रतिम कामगिरी केली असून आता रोहित शर्माची वेळ आली आहे, असंही गांगुली म्हणाला. 

'रोहित शर्माचं लक्ष आयसीसी स्पर्धांवर'

सध्या रोहित शर्मा तिन्ही क्रिकेट फॉर्मेटमध्ये भारताचा कर्णधार (Indian Captain) आहे. याबद्दल बोलताना सौरव गांगुली म्हणाला, ''जवळपास मागील 10 वर्षांत भारतीय टीम एकही आयसीसी टूर्नांमेंट जिंकलेली नाही. त्यामुळे रोहित शर्मा आता कर्णधार झाल्यानंतर त्याचं लक्ष आयसीसी स्पर्धांवर असेल.'' रोहित आता आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतऱणार आहे. सध्या भारतीय संघाकडे आशिया कपचं विजेतेपद असल्यानं आपलं जेतेपद कायम ठेवण्यासाठी संघ मैदानात उतरेल. विशेष म्हणजे शर्मानेच हे टायटल जिंकवून दिल्याने तो पुन्हा एकदा विजय मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहितने आतापर्यंत भारताचं कर्णधारपद स्विकारल्यानंतर अप्रतिम कामगिरी कायम ठेवली आहे. त्याने सर्वच्या सर्व मालिका आतापर्यंत पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर जिंकल्या असून तो ही विजयी घोडदौड कायम ठेवेण्यासाठी सर्व प्रयत्न नक्कीच करेल. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Thane : शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा दिघेंच्या आनंद आश्रमातRaj Thackeray Thane : राज ठाकरे आनंद आश्रमात, Anand Dighe यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तकTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM: 12 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात, होता हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार

'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर

सासूने पकडले पाय, पतीने दाबला गळा; नवऱ्याने सासूच्या मदतीने बायकोचा काटा काढला

Embed widget