IND vs WI Live Score Day1 : दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जयस्वालनं गाजवला, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 318 धावा
India vs West Indies Live Scorecard 2nd Test Day1 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे.
LIVE

Background
India vs West Indies Live Scorecard 2nd Test Day1 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना शुक्रवार, 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला सामना एक डाव आणि 140 धावांनी जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वालनं नाबाद 173 धावांची खेळी केली आहे. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जयस्वालनं गाजवला असून पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 318 धावा झाल्या आहेत. साई सुदर्शन 87 धावांवर बाद झाला.
दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जयस्वालनं गाजवला, पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 318 धावा
भारतानं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जयस्वालनं नाबाद 173 धावांची खेळी केली आहे. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस यशस्वी जयस्वालनं गाजवला असून पहिल्या दिवसअखेर भारताच्या 2 बाद 318 धावा झाल्या आहेत. साई सुदर्शन 87 धावांवर बाद झाला.
IND vs WI Live Score Day1 : यशस्वी जैस्वाल खंबीर! साई सुदर्शनचं पहिले कसोटी शतक हुकले
जोमेल वॉरिकनने साई सुदर्शनला एलबीडब्ल्यू बाद केले. त्याचं शतक हुकले, त्याने 165 चेंडूत 12 चौकारांसह 87 धावा केल्या. त्याने यशस्वी जैस्वालसोबत दुसऱ्या विकेटसाठी 193 धावांची भागीदारी केली. कर्णधार शुभमन गिल सध्या यशस्वीसोबत क्रीजवर आहे. जैस्वालने आधीच 126धावा केल्या आहेत.




















