एक्स्प्लोर

IND vs WI : कॅरेबिअनमध्ये मराठमोळ्या अजिंक्यचा दबदबा, वेस्ट इंडिजविरोधात काढतो खोऱ्याने धावा

Ajinkya Rahane Vs WI In Test : बुधवारपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे.

Ajinkya Rahane Vs WI In Test : बुधवारपासून भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा शुभारंभ होणार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरोधात सुरुवातीला दोन कसोटी सामने खेळणार आहे. 12 जुलै रोजी डोमिनिका येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. दीड वर्षानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे याला भारतीय संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आलेय. गेल्या काही दिवसांपासून अजिंक्य रहाणे दमदार फॉर्मात आहे. देशांतर्गंत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. वेस्ट इंडिजमध्येही अजिंक्य रहाणे दमदार कामगिरी करु शकतो. कारण, वेस्ट इंडिजविरोधात त्याची बॅट नेहमीच तळपते. वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य रहाणे याने खोऱ्याने धावा काढल्या आहेत. 

वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य रहाणे याने कसोटीत 102.8 च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. अजिंक्य रहाणे याने आठ कसोटी डावात पाच वेळा 50 पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. वेस्ट इंडिजमध्ये अजिंक्य रहाणे याने सहा कसोटी सामन्यात 1091 धावा काढल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 108 इतकी आहे. सध्या वेस्ट इंडिजमध्ये असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूमध्ये कॅरेबिअनच्या खेळपट्टीवर सर्वाधिक धावा काढण्याचा पराक्रम अजिंक्य रहाणे याच्याच नावावर आहे.  

दीड वर्षानंतर पुनरागमन - 

अजिंक्य रहाणे याने 18 महिन्यानंतर भारतीय संघात पुन्हा एकदा पुनरागमन केले आहे. देशांतर्गत सामन्यात खोऱ्याने धावा काढल्याच... पण चेन्नईमध्ये खेळताना त्याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला. फॉर्मात परतलेल्या अजिंक्य रहाणे याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली. इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये रहाणे याने दमदार कामगिरी केली. भारताकडून त्याने सर्वाधिक धावा काढल्या. पण तो भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. वेस्ट इंडिजविरोधात अजिंक्य रहाणे याला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. कॅरेबिअन आर्मीविरोधात अजिंक्य रहाणे भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. 

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल,ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.

आणखी वाचा :

अजिंक्य रहाणेच पुनरागमन होऊ शकते तर विराटही पुन्हा कर्णधार होऊ शकतो, माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

IND vs WI : वेस्ट इंडिजमध्ये भारताची कामगिरी कशी? कसोटी मालिकेपूर्वी ही आकडेवारी वाचाच 

India Tour of West Indies : मिशन वेस्ट इंडिज! 12 जुलैपासून कॅरेबिअनसोबत भिडणार रोहित अॅण्ड कंपनी, संपूर्ण माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :9 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 9 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 7 AM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Maharashtra MLAs oath taking ceremony: स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ, भाजपच्या देवेंद्र कोठेंचा व्हिडीओ व्हायरल
भाजपच्या 'या' आमदाराने स्वामी समर्थांचं नामस्मरण करत घेतली आमदारकीची शपथ
CIBIL : एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
एका पेक्षा अधिक PAN Card वापरत असाल तर Credit Score वर काय परिणाम होतो? 
Nandurbar Asalod Liquor Ban : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुची बाटली अखेर 'आडवी', महिलांनी दारूबंदी करून दाखवली
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Embed widget