Ind vs WI Test Match Jayden Seales Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालला चेंडू फेकून मारणे पडले महागात; वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर आयसीसीकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
Ind vs WI Test Match Jayden Seales Yashasvi Jaiswal: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

Ind vs WI Test Match Jayden Seales Yashasvi Jaiswal: सध्या भारत आणि वेस्ट इंडिज (Ind vs WI 2nd Test Match) यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज सामन्यातील चौथा दिवस असून भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने आधीच 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारतविरुद्ध दुसरा कसोटी सामना सुरु असताना आयसीसीने वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सवर (ICC Action On Jayden Seales) मोठी कारवाई केली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान एका वादग्रस्त घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने (Jayden Seales) यशस्वी जैस्वालवर (Yashasvi Jaiswal) रागाने चेंडू फेकला होता. या प्रकरणी आयसीसीने सील्सला लेव्हल 1 आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावला. तसेच जेडेन सील्सच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंटही दिला आहे.
West Indies pacer found guilty of breaching the ICC Code of Conduct during the second #INDvWI Test.https://t.co/0FZ42VYRSx
— ICC (@ICC) October 12, 2025
नेमकं प्रकरण काय? (Jayden Seales throwing ball Yashasvi Jaiswal)
भारताच्या पहिल्या डावाच्या 29 व्या षटकात ही घटना घडली. जेडेन सील्स गोलंदाजी करत असताना यशस्वी जैस्वालने खेळलेला चेंडू जेडेनच्या हातात गेला. यानंतर जेडेनने तोच चेंडू रागाने यशस्वी जैस्वालच्या दिशेने फेकला. ज्याची काहीच गरज नव्हती. जेडेनच्या या कृतीवर यशस्वी जैस्वालने मैदानात कोणतीच रिअॅक्शन दिली नाही. मात्र आता आयसीसीने जेडेनवर आतापर्यंतची मोठी कारवाई केली आहे.
- 214* vs ENGLAND.
— AJAY (@SamsonSupremacy) October 11, 2025
- 209 vs ENGLAND.
- 175 vs WEST INDIES.
- 171 vs WEST INDIES.
- 161 vs AUSTRALIA.
_ 175 vs WI
THIS IS 23-YEAR-OLD YASHASVI JAISWAL. 🔥
The OG All formate player pic.twitter.com/KwcaYPWPRS
आयसीसीने कोणता निर्णय घेतला? (Jayden Seales guilty of breaching the ICC Code of Conduct )
आयसीसीच्या अहवालानुसार, सील्सने आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.9 चे उल्लंघन केले. या नियमात असे म्हटले आहे की चेंडू किंवा इतर कोणतेही उपकरण खेळाडूकडे किंवा त्याच्या जवळ अन्याय्य किंवा धोकादायक पद्धतीने फेकणे बेकायदेशीर आहे. सील्सने त्याच्या बचावात म्हटले की, तो फक्त फलंदाजाला धावबाद करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु अनेक अँगलने व्हिडीओ पाहिल्यानंतर, सामनाधिकारीने असा निष्कर्ष काढला की फलंदाज क्रीजच्या आत होता आणि तो थ्रो खेळाच्या भावनेला अनुसरून नव्हता. म्हणून, हा "अनावश्यक थ्रो" मानला गेला. त्यामुळे सदर प्रकरणी आयसीसीने सील्सला लेव्हल 1 आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के दंड ठोठावला. तसेच एक डिमेरिट पॉइंटही दिला. या दंडासह, सील्सचे आता एकूण दोन डिमेरिट पॉइंट आहेत. जर एखाद्या खेळाडूने 24 महिन्यांत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट जमा केले तर त्यांच्यावर बंदी घातली जाऊ शकते. भविष्यात अशाच घटनांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयसीसीने दिला आहे.





















