IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा 'हा' विक्रम मोडण्यापासून फक्त 23 धावा दूर
India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.
![IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा 'हा' विक्रम मोडण्यापासून फक्त 23 धावा दूर IND vs SL: virat kohli To make history in second Test against Sri Lanka! Mark Waugh is just 23 runs away from breaking the 'yes' record IND vs SL: श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटीत विराट कोहली इतिहास रचणार! मार्क वॉचा 'हा' विक्रम मोडण्यापासून फक्त 23 धावा दूर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/7a6f95a04a49cc5ce2ff888913218e40_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Vs Sri Lanka: भारत आणि श्रीलंका (IND Vs SL) यांच्यात 12 मार्चपासून दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. हा सामना बंगळुरूच्या (Bengaluru) एम. चिन्नास्वामी स्डेडिअमवर (M Chinnaswamy Stadium) होणार आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खास विक्रमाला गवसणी घालू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉला (Mark Waugh) मागे टाकू शकतो. या विक्रमापासून विराट कोहली केवळ 23 धावा दूर आहे.
श्रीलंकाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू उत्साहात आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करेल. तर, या सामन्यात विराट कोहलीकडं मार्क वॉकचा विक्रम मोडण्याची संधी आहे. मार्क वॉनं कसोटी क्रिकेटच्या 128 सामन्यात 8 हजार 29 धावा केल्या आहेत. तर, विराट कोहलीनं 100 कसोटी सामन्यात 8007 धावांचा टप्पा गाठलाय. ज्यात 27 शतक आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली 23 धावा करताच मार्क वॉला मागे टाकेल.
विराट कोहलीनं बंगळुरू कसोटीत शतक झळकावलं तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो अनेक खेळाडूंना मागे टाकू शकतो. या बाबतीत तो सध्या 32 व्या क्रमांकावर आहे. शतक झळकावल्यानंतर तो मार्क वॉ तसेच गॅरी सोबर्स आणि जेफ्री बॉयकॉट यांना मागे टाकू शकतो.
दरम्यान, विराट कोहलीनं गेल्या अनेक महिन्यांपासून एकही शतक मारलं नाही. त्यानं 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात अखरेचं कसोटी शतक झळकावलं होतं. या सामन्यात विराट 136 धावांची खेळी केली होती. त्यानंतर विराट कोहलीनं आतापर्यंत कसोटी सामन्यात एकही शतक केलं नाही. श्रीलंकाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली शतकाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून केली जात आहे.
हे देखील वाचा-
- Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' यंदा साताऱ्यात; 4 ते 9 एप्रिलदरम्यान रंगणार मानाच्या गदेसाठी चुरस
- German Open : जर्मन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सायनासह पीव्ही सिंधू पराभूत, श्रीकांत मात्र विजयी
- Jhulan Goswami: झुलन गोस्वामीची ऐतिहासिक कामगिरी; विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमाशी केली बरोबरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)