एक्स्प्लोर

IND vs SL : भारत अन् श्रीलंका टी 20 मालिकेत आमने सामने येणार, मॅच कुठं पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

IND vs SL T20  : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. या मालिकेत विजय मिळवण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल. 

पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. भारताचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) करतोय. तर, श्रीलंका होमग्राऊंडवर चारिथ असलंका (Charith Asalanka) याच्या नेतृत्त्वात मैदानात उतरणार आहे. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांना या मालिकेसाठी नवे प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. भारताच्या प्रशिक्षक पदावर गौतम गंभीरची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, श्रीलंकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सनथ जयसूर्या जबाबदारी पार पाडणार आहे. 

रोहित शर्माचा वारसा चालवण्याचं सूर्यापुढं आव्हान

रोहित शर्मानं भारताला टी 20 वर्ल्डकपचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतीय संघानं झिम्बॉब्वे विरुद्धची मालिका जिंकली. आता श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकण्याचं आव्हान सूर्यकुमार यादवसमोर असेल.

सूर्यकुमार यादव भारताच्या टी 20 संघाचा पूर्णवेळ कॅप्टन म्हणून मैदानात उतरेल. शुभमन गिल उपकर्णधार असेल. हार्दिक पांड्या देखील संघात असणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ टी 20 मालिकेपासून सुरु होत आहे.

भारत-श्रीलंका यांच्यातील सामन्यांचं थेट प्रक्षेपण कुठं होणार?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेचं आणि तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचं प्रक्षेपण टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवरुन करण्यात येईल.  मोबाईलवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांना सोनी लाईव्ह ॲपवर ही मालिका पाहता येणार आहे. मोबाईलवर सामना पाहण्यासाठी तुम्हाला सोनी लाईव्हचे सदस्यत्व घ्यावे लागेल.

भारताचा संघ : 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा संघ : 

चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेज, महेश वेलेज, चामिंडू विक्रमसिंघे, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा(दुखापतीमुळं मालिकेबाहेर), दुष्मंथा चमीरा, (दुखापतीमुळं मालिकेबाहेर)आणि बिनुरा फर्नांडो.

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

27 जुलै - 1ली टी-20 (पल्लेकेले)

28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)

30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)

4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)

7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो) 

संबंधित बातम्या :

हार्दिक पांड्या अन् मुंबईच्या खेळाडूंमध्ये कसं वातावरण होतं,जसप्रीत बुमराहनं सगळं सांगितलं, म्हणाला... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget