Team India : गंभीरचं स्मितहास्य, हार्दिककडून सूर्याची गंमत अन् दमदार प्रॅक्टिस, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Team India :भारतीय क्रिकेट संघ गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात नव्या पर्वासाठी सज्ज झाला आहे. भारतीय क्रिकेटमधील टी 20 मधील नवं पर्व सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाच्या निमित्तानं सुरु होत आहे.
कोलंबो : भारतीय क्रिकेटमधील नव्या पर्वाची उद्यापासून सुरुवात होत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचा कार्यकाळ श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेपासून सुरु होत आहे. सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) टी 20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा (Team India) पूर्णवेळ कर्णधार म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात करेल. सूर्यकुमारनं यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व केलं होतं मात्र आता त्याला टी 20 क्रिकेटमधील भारताचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून संधी देण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी 2026 च्या टी 20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून सूर्यकुमार यादवला संधी दिल्याचं म्हटलं. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली टी 20 मॅच उद्या होणार आहे. या मॅचपूर्वी बीसीसीआयनं टीम इंडियात ऑल इजवेल असल्याचं दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात युवा खेळाडू क्षेत्ररक्षणाचा सराव करताना पाहायला मिळतात.
बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओत नेमकं काय?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिका उद्यापासून सुरु होत आहे. यापूर्वी बीसीसीआयनं भारतीय क्रिकेटपटूंचा एक व्हिडीओ शेअर केलाय. भारतीय संघातील खेळाडूंचं खेळीमेळीचं वातावरण पाहताना गौतम गंभीर स्मितहास्य करताना दिसून येतो. सरावसत्रात टीम इंडियाच्या युवा खेळाडूंकडून अचूक क्षेत्ररक्षण पाहून गौतम गंभीर स्मितहास्य करताना दिसून येतो. सूर्यकुमार यादव कोणतातरी आकडा सांगताना गडबडतो हे पाहून हार्दिक पांड्यासह भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू त्याची मजा घेताना पाहयाला मिळतात.
भारतीय क्रिकेटमधील गंभीर आणि सूर्याच्या पर्वाची सुरुवात
राहुल द्रविडनं मुख्य प्रशिक्षक पद सोडल्यानंतर ती जबाबदारी आता गौतम गंभीर पार पाडणार आहे. आगामी वनडे वर्ल्ड कपपर्यंत गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असेल. गौतम गंभीरच्या कारकिर्दीची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 मालिकेपासून होत आहे.
रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर नवा कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादववर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर भारतानं शुभमन गिलच्या नेतृत्त्वात झिम्बॉब्वेचा दौरा केला होता. ती मालिका भारतानं 4-1 अशी जिंकली होती. आता श्रीलंका दौऱ्यात पहिली मालिका संघाला जिंकवून देण्याचं आव्हान सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीरपुढं असेल.
टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रायन पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ :
चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलेज, महेश वेलेज, चामिंडू विक्रमसिंघे, मथिशा पाथिराना, नुवान तुषारा(दुखापतीमुळं मालिकेबाहेर), दुष्मंथा चमीरा, (दुखापतीमुळं मालिकेबाहेर)आणि बिनुरा फर्नांडो.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
27 जुलै - पहिली टी-20 (पल्लेकेले)
28 जुलै - दुसरी टी-20 (पल्लेकेले)
30 जुलै - तिसरी टी-20 (पल्लेकेले)
Hey you fielding drill - How so fun 😄😎
— BCCI (@BCCI) July 26, 2024
Quite a vibe in the group in this fun session at Kandy 🤙#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/nIaBOnM8Wy
संबंधित बातम्या :