एक्स्प्लोर

IND vs SL Super Over drama : सूर्यासोबत सगळ्या खेळाडूंनी अंपायरला घेरलं; भारत-श्रीलंकेच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा, सुपर ओव्हरच्या एक-एक चेंडूचा थरार, पाहा Video

Why was Dasun Shanaka Not OUT Super Over Drama : आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यापूर्वीचा सर्वात रोमांचक सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या संपूर्ण हंगामात इतका चुरशीचा सामना झालाच नव्हता.

IND vs SL Super Over drama Asia Cup 2025 : आशिया कप 2025च्या अंतिम सामन्यापूर्वीचा सर्वात रोमांचक सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या संपूर्ण हंगामात इतका चुरशीचा सामना झालाच नव्हता. या सामन्यात भारतीय खेळाडूंसह चाहत्यांनीही डोक्याला हात लावला. कारण, आयसीसीच्या एका नियमाने श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाका वाचला होता. हा नियम स्वतः भारतीय खेळाडूंनाही माहिती नव्हता. त्यामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत सगळ्या खेळाडूंनी अंपायरला घेराव घातल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

भारत-श्रीलंकेच्या सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा

सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेची फलंदाजी सुरू असताना, अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर शनाका चुकला आणि त्याने धाव घेण्याचा प्रयत्न केला. मागून संजू सॅमसनने थेट थ्रो मारून कामिंदु मेंडिसला आऊट केले. लेग अंपायरने लगेच त्याला आऊटही दिले. त्या क्षणी असे वाटले की, श्रीलंकेचा डाव संपला आहे आणि आता खेळाडू मैदानाबाहेर जातील.

मात्र, याचवेळी मोठा ट्विस्ट आला. कारण अर्शदीपने याआधी शनाकाच्या कॅचसाठी अपील केली होती आणि अंपायरनेही बोट वर करून त्याला आऊट दिले होते. पण थर्ड अंपायरने रीप्ले पाहिल्यावर चेंडूला बॅटचा स्पर्शच झालेला नव्हता, त्यामुळे शनाका नॉट आऊट ठरला. आता खरी कोंडी झाली ती इथेच. शनाका नॉट आऊट ठरला, पण सॅमसनने स्ट्रायकर एंडवर मेंडिसला रनआऊट केले होते. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. पण नियमानुसार शनाका नॉट आऊट असल्याचं पंचांनी स्पष्ट केलं.

आयसीसीच्या नियमांनुसार काय घडतं?

इथेच क्रिकेटचा एक महत्त्वाचा नियम लागू झाला. नियमानुसार, जेव्हा मैदानी अंपायर एखाद्या फलंदाजाला आऊट ठरवतो, तेव्हाच चेंडू 'डेड' मानला जातो. हा निर्णय नंतर बदलला गेला तरी फरक पडत नाही. नियम 20.1.1.3 नुसार, ज्या घटनेमुळे फलंदाज आऊट ठरतो, त्या क्षणापासून चेंडू डेड मानला जातो. याशिवाय अजून एक नियमही हे स्पष्ट करतो. नियम 3.7.1 मध्ये म्हटले आहे की, "प्लेअर रिव्ह्यू नंतर जर मूळ आऊटचा निर्णय बदलून नॉट आऊट केला गेला, तर आधीच निर्णय दिला गेला त्या क्षणापासूनच चेंडू डेड मानला जाईल."

सुपर ओव्हरच्या एक-एक चेंडूचा थरार 

श्रीलंकेच्या सुपर ओव्हरमध्ये भारताकडून अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला.

  • पहिला चेंडू - पहिल्याच चेंडूवर कुसल परेरा आऊट झाला. रिंकू सिंगने त्याचा कॅच घेतला.
  • दुसरा चेंडू - कामिंदू मेंडिसने 1 धाव घेतली.
  • तिसरा चेंडू - डॉट बॉल
  • चौथा चेंडू - वाईड
  • चौथा चेंडू - अर्शदीप सिंगने आधी कॅचसाठी अपील केले होते, त्यामुळे दासुन शनाका आऊट देण्यात आले नाही.
  • पाचवा चेंडू - दासुन शनाका आऊट

टीम इंडियाच्या सुपर ओव्हरमध्ये काय घडलं?

सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेने 2 धावा केल्या आणि भारतासमोर 3 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर तीन धावा काढून भारताला रोमांचक विजय मिळवून दिला.

हे ही वाचा -

IND vs SL ASIA CUP 2025 : श्रीलंकेचा शनाका आऊट की नॉट आऊट? सुपर ओव्हरमधला सुपर ड्रामा… पण नियम काय सांगतो?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget