IND vs SL : सूर्यानं विश्वास ठेवला पण संजू सॅमसन पुन्हा फेल, शुन्यावर बाद, भारताच्या टॉप ऑर्डरला गळती
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात तिसऱ्या टी 20 मॅचला सुरुवात झाली आहे. भारताची टॉप ऑर्डर आजच्या मॅचमध्ये अयशस्वी ठरली आहे.
पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील मॅच पावसामुळं उशिरानं सुरु झाली. या मॅचमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असलंका यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवनं (Surya Kumar Yadav) आज संघात मोठे बदल केले. सूर्यकुमार यादवनं संंघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली. हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलला विश्रांती देण्यात आली.
भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली असून यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (Sanju Samson) आणि रिंकू सिंग, सूर्यकुमार यादव लवकर बाद झाले आहेत. यशस्वी जयस्वाल मागील मॅचप्रमाणं यावेळी देखील बाद झाला. तर, संजू सॅमसन आणि रिंकू सिंगला चांगली कामगिरी करता आली नाही. संजू सॅमसन पुन्हा फेल ठरला, तो खातंही उघडू शकला नाही तर रिंकू सिंगनं केवळ 1 रन केली
भारताची सुरुवात निराशाजनक झाली असून सुरुवातीलाच दोन धक्के बसले आहेत. यशस्वी जयस्वाल आणि संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव बाद झाले आहेत. पॉवर प्लेमध्ये भारतानं 4 विकेटवर 30 धावा केल्या आहेत.
भारतानं यापूर्वीच दोन मॅच जिंकल्यानं संघात बदल करण्याचा निर्णय घेतला. आजच्या मॅचमध्ये शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद यांना संधी देण्यात आली. तर, आजारी असल्यानं दुसऱ्या टी 20 मधून संघाबाहेर राहिलेला शुभमन गिल याल देखील संघात स्थान मिळालं आहे.
भारताकडून चार जणांना विश्रांती
भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत दोन सामने यापूर्वी जिंकलेले आहेत. दोन मॅच जिंकत भारतानं मालिकेत विजय मिळवला आहे. आजच्या मॅचमध्ये हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल ऐवजी सूर्यकुमार यादवनं शिवम दुबे, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि खलील अहमदला संधी दिली आहे.
भारत श्रीलंकेला क्लीन स्वीप देणार?
भारतानं श्रीलंकेला त्यांच्या होम ग्राऊंडवर पहिल्या दोन मॅचमध्ये पराभूत केलं आहे. तिसऱ्या मॅचमध्ये देखील विजय मिळवून श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा भारताचा प्रयत्न आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात यंग ब्रिगेडला यामध्ये यश येणार का हे पाहावं लागणार आहे.मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतानं सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात पहिला मालिका विजय मिळवला आहे.
भारताचा संघ
यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद
श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंडू मेंडिस, चरिथ असालंका (कर्णधार), चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तिक्षाना, मथिशा पथिराना आणि असिथा फर्नांडो
संबंधित बातम्या :