IND vs SL 3rd T20 : सूर्या ब्रिगेड श्रीलंकेला व्हाईट वॉश देणार, गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात भारताकडे इतिहास रचण्यची संधी
IND vs SL 3rd T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी टी 20 मॅच आज होणार आहे. पल्लेकेलेमध्ये तिसरी टी20 मॅच होणार आहे.
पल्लेकेले : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तिसऱ्या टी 20 मॅचची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्त्वात भारतानं पहिल्या दोन मॅच जिंकल्या आहेत. पहिल्या दोन टी 20 मॅच जिंकत भारतानं मालिका जिंकली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात यंग ब्रिगेडनं आपली क्षमता सिद्ध करुन दाखवली आहे. आता तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये श्रीलंकेचा संघ पलटवार करण्याची शक्यता आहे. आजच्या मॅचमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील यंग ब्रिगेडला मालिका 3-0 अशी जिंकण्याची संधी आहे. आज सूर्यकुमार यादव आजच्या तिसऱ्या मॅचमध्ये कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भारत आणि श्रीलंका आमने सामने येणार
पल्लेकेले मध्ये भारत आणि श्रीलंका तिसऱ्या टी 20 मॅचच्या निमित्तानं समोर येतील. भारतानं पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्या असून तिसऱ्या टी 20 मॅचमध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात तिसरी टी 20 मॅच देखील जिंकण्याच्या इराद्यानं ते मैदानात उतरतील. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला पहिल्या दोन मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. सूर्यकुमार यादव प्रमाणं चारिथ असलंका याची देखील ही पहिली मालिका होती.
सूर्यकुमार यादव तिसऱ्या मॅचमध्ये कुणाला संधी देणार?
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर दाखल झाला होता. सूर्युकुमार यादवनं पहिल्या दोन मॅचमध्ये केवळ दोन वेगवान गोलंदाजांना संघात संधी दिली होती. त्यामध्ये अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश होता. तिसऱ्या मॅचमध्ये या दोघांना स्थान दिलं जाणार की त्यांना विश्रांती दिली जाणार हे पाहावं लागेल. दुसरीकडे संजू सॅमसनला शुभमन गिल आजारी असल्यानं संधी देण्यात आली होती. दुसऱ्या टी 20 मॅचमध्ये संजू सॅमसनला सलामीला पाठवण्यात आलं होतं. मात्र, तो अपयशी ठरला होता. आज तिसऱ्या मॅचसाठी शुभमन गिल उपलब्ध असल्यास संजू सॅमसनला संघातून वगळलं जाऊ शकतं. याशिवाय अनुभवी खेळाडूंना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंवर सर्यकुमार यादव विश्वास दाखवणार का हे पाहावं लागणार आहे.
भारत आणि श्रीलंकेचा संघ
भारताचा संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग,रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या , अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेचा संघ :
चारिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल झेनिथ परेरा, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चंडीमल, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा,मथिशा पाथिराना, एम. तिक्षणा, दिलशान मदूशंका
संबंधित बातम्या :
Ind vs SL: श्रीलंकेत असूनही दुरावा; टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा वेगळा सराव, नेमकं कारण काय?