एक्स्प्लोर

IND vs SL : वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर, भारत-श्रीलंका सामन्यातील सर्व माहिती एका क्लिकवर

IND vs SL Playing 11, Pitch Report & Live Streaming: 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात भिडणार आहेत. 

IND vs SL, World Cup 2023: भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये आज वानखेडेच्या मैदानावर आमनासामना होणार आहे. 2011 च्या विश्वचषकाची फायनल या दोन्ही संघामध्ये याच मैदानावर झाली होती. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात भिडणार आहेत. लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलचे तिकिट जवळपास निश्चित केलेय. गुणतालिकेत टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे श्रीलंका संघाने पाचपैकी तीन सामने गमावले आहेत. त्यांना फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय. श्रीलंकेला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी पुढील प्रत्येक सामन्यात विजय मिळवायचाच आहे. यंदाच्या विश्वचषकात अजय असणारा टीम इंडिया एकमेव संघ आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना रंजक होणार आहे. हेड टू हेड, पिच रिपोर्ट, वेदर अपडेट अन् बरेच काही जाणून घेऊयात....

वानखेडेवरचा रेकॉर्ड काय ?

मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना होणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर विश्वचषकातील दोन सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकाने प्रथम फलंदाजी कताना 380 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आयपीएलमध्येही या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पडत असल्याचे आकडेवारी सांगते. वानखेडेचे मैदान हायस्कोरिंग आहे. त्यामुळे पहिल्यांदा फलंदाजी करुन मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस प्रत्येक संघाचा असतो. 

IND vs SL, World Cup 2023: Pitch report 

वानखेडेची खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांना मदत करणारी आहे. मागील 20 वनडेचा विचार केल्यास पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 258 इतकी आहे. नाणेफेक जिंकणारा संघ या मैदानावर प्रथम फलंदाजी करेल. 

IND vs SL, World Cup 2023: Weather update 

मुंबईमध्ये आज पावसाची शक्यता थोडीही नाही. हवामान एकदम क्लिअर असेल. त्यामुळे सामन्यात पावसाचा कोणताही व्यत्यय येणार आहे. तापमान 29 डिग्रीच्या आसपास असेल.

India vs Sri Lanka Head to Head in ODI World Cup

विश्वचषकाच्या मैदानात भारत आणि श्रीलंका संघामध्ये नऊ वेळा आमनासामना झालाय. दोन्ही संघाने प्रत्येकी चार चार सामन्यात विजयस मिळवला आहे. एक सामना रद्द झाला होता.

हेड टू हेड आकडे काय सांगतात ?

भारत आणि श्रीलंका संघामध्ये आतापर्यंत 167 वनडे सामने झाले आहेत. यामध्ये टीम इंडियाने 98 सामन्यात विजय मिळवलाय. तर श्रीलंकेच्या संघाने 57 सामन्यात बाजी मारली आहे. दोन्ही संघातील 11 सामन्यात कोणताही निकाल लागला नाही. तर एक सामना बरोबरीत सुटला.  

मागील पाच सामन्यातील काय निकाल लागला ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील मागील पाच सामन्याचा निकाल एकतर्फी लागलाय. पाचही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. आशिया चषकातही भारताने श्रीलंकेचा दारुण पराभव केला होता. 

लाईव्ह कुठे पाहाल ?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना  टिव्हीवर  स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल.  स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल. मोबईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अॅपवर हा सामना मोफत पाहता येईल. त्यासाठी कोणतेही सब्सक्रिप्शन चार्ज लागणार नाही. फ्रीमध्ये या सामन्याचा आनंद घेता येईल. त्याशिवाय एबीपी माझाच्या संकेतस्थळावर सामन्यासंदर्भात सर्व माहिती वाचता येईल.

भारतीय संघाची संभाव्य प्लेईंग 11 - 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज

श्रीलंका संघाची संभाव्य प्लेईंग 11 -

दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलांका, एंजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, महीश तिक्षाना, दिलशान मदुशंका, कसून राजिथा आणि दुष्मंता चमीरा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
Embed widget