एक्स्प्लोर

IND vs SL : फर्नांडो आणि निसांकाची आक्रमक सुरुवात, रियान परागनं डाव पलटवला, भारतापुढं विजयासाठी किती धावांचं आव्हान?

IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वनडे मध्ये फर्नांडो आणि कुसल मेंडिस यांनी श्रीलंकेचा डाव सावरला.

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरी वनडे मॅच कोलंबोत सुरु आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  श्रीलंकेकडून निसांका आणि फर्नांडो यांनी चांगली सुरुवात करुन दिली.  श्रीलंकेनं निसांका, फर्नांडो आणि कुसल मेंडिस या तिघांच्या फलंदाजीच्या जोरावर  भारतासमोर धावांचं विजयासाठी 249 आव्हान ठेवलं.  श्रीलंकेनं 50 ओव्हरमध्ये 7  बाद 248  धावा केल्या. भारताकडून रियान परागनं 3 विकेट घेतल्या.

भारतानं आज केएल राहुल आणि अर्शदीप सिंग यांना वगळून रिषभ पंत आणि रियान परागला स्थान दिलं होतं. रियान परागला संघात स्थान देण्याचा निर्णय योग्य ठरला. रियान परागनं श्रीलंकेच्या तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोनं 96 धावा केल्या. पथुम निसांकानं 45 धावा केल्या. यानंतर श्रीलंकेचा डाव कुसल मेंडिसनं सावरला. कुसल मेंडिसनं  59 धावा केल्या.  

रियान परागचं दणक्यात पदार्पण

 रियान परागला रोहित शर्मानं अर्शदीप सिंगच्या जागी संघात स्थान दिलं होतं. विराट कोहलीच्या हस्ते भारतीय संघाची कॅप देऊन रियान परागचं स्वागत करण्यात आलं. रियान परागनं टी 20 मालिकेतील कामगिरी प्रमाणं वनडे मध्ये देखील दमदार कामगिरी केली. रियान परागनं 96  धावांची खेळी करणाऱ्या अविष्का फर्नांडोला बाद करत एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली विकेट मिळवली. यानंतर रियान परागनं श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंका याला देखील बाद केलं. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या दुनिथ वेल्लालगे याला देखील रियान परागनं बाद करत तिसरी विकेट मिळवली

भारतापुढं विजयासाठी  किती धावांचं आव्हान? 

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या दोन पैकी एक मॅच टाय झाली होती. यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये श्रीलंकेनं भारताला पराभूत केलं होतं. आज श्रीलंकेच्या फलंदाजांनी भारतासमोर विजयासाठी 249 धावांचं आव्हान ठेवलं आहे. 

रोहित शर्मा- विराट कोहलीवर मोठी जबाबदारी 

भारतानं 1997 पासून श्रीलंकेविरुद्ध एकही वनडे मालिका गमावलेली नाही. भारतानं गेल्या 27 वर्षात  11 मालिकांमध्ये श्रीलंकेला पराभूत केलं होतं. तीन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंका 1-0 अशी आघाडीवर असल्यानं भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याच्या कार्यकाळातील पहिली एकदिवसीय मालिका असल्यानं भारताला विजय मिळवणं आवश्यक आहे. भारताला विजय मिळवायचा असल्यास रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर मोठी दबाबदारी असेल.  

संबंधित बातम्या :

श्रीलंकेविरुद्ध आज 'करो या मरो'ची लढाई; भारतीय संघात होणार मोठे बदल, पाहा संभाव्य Playing XI

Rohit Sharma : सचिन तेंडुलकरच्या काळातील नकोसा विक्रम, रोहित शर्मावर तशीच वेळ येणार? टीम इंडियाला कोणत्याही स्थितीत जिंकावं लागणार कारण..

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
इमरान खान यांच्यासाठी एकवटले माजी कर्णधार, कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र
इमरान खान यांच्यासाठी कपिल देव, सुनील गावस्कर यांच्यासह 14 दिग्गजांचं पाकिस्तान सरकारला पत्र...
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी

व्हिडीओ

Mulund Metro Slab  : मुलुंडमधील मेट्रो स्लॅब अपघात प्रकरण, 2 कंपन्याना काळ्या यादीत टाकणार
Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Super-8 Schedule : भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
भारतासमोर समोर सुपर 8 मध्ये कोणाचं आव्हानं? 'या' दिवशी झिम्बॉब्वे विरुद्ध सामना, संपूर्ण वेळापत्रक 
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2 मार्चला ईपीएफओच्या बोर्डाची महत्त्वाची बैठक, व्याज दरावर निर्णय होणार 
Share Market : सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 174 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
धक्कादायक, जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
जळगावात पोलीस दलाच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर 1 कोटी 33 लाखांचा अपहार, आरोपी पोलीस उपनिरीक्षक फरार
Vaibhav suryavanshi: तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
तडाखेबंद फलंदाज वैभव सूर्यवंशीची 10 वीच्या बोर्ड परीक्षेला दांडी; प्रिंसिपल सिन्हांनी स्पष्टच सांगितलं पुढं काय
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
मोठी बातमी! ZP झाल्या आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल; कामाला लागा, मंत्रालयातून आदेश जारी
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
एबीपी इम्पॅक्ट... उपसचिव मिलींद शेणॉय यांची उचलबांगडी; अजित दादांच्या निधनादिवशीच अल्पसंख्यांक प्रमाणपत्रांचे वाटप
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2026 | मंगळवार
Embed widget