Jadeja Test Record: जाडेजानं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय
Jadeja Test Record: रवींद्र जाडेजाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने श्रीलंकेला पहिल्या कसोटीत एक डाव आणि 175 धावांनी मात दिली आहे.
Jadeja Test Record: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) सामन्यात भारताने मिळवलेल्या मोठ्या विजयाचा शिल्पकार ठरला आहे, रवींद्र जाडेजा. जाडेजाने सामन्यात एका डावात नाबाद 175 धावांसह दोन डावांत एकूण 9 विकेट्स घेतल्या आहेत. ज्याच्याच जोरावर भारतान एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. दरम्यान या विजयाच्या जोरावर जाडेजा एका कसोटीत 170 हून अधिक धावा तसंच 5 विकेट हॉल घेणारा इतिहासातील तिसरा भारतीय ठरला आहे.
जाडेजाने सामन्याच्या पहिल्या डावात 175 धावांची नाबाद खेळी केली. ज्यामुळेच भारत 574 धावांची मोठी धावसंख्या करु शकला. तर श्रीलंकेच्या पहिल्या डावादरम्यान जाडेजाने पाच विकेट घेत श्रीलंकेला सर्वबाद करण्यात मोठी कामगिरी केली. या खेळीसोबतच त्याने या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर दुसऱ्या डावातही जाडेजाने 4 विकेट घेतल्या. दरम्यान जाडेजा आधी ही कामगिरी विनू मंकड आणि पॉली उमरीगर या दिग्गाजांनी केली होती. विनू यांनी 1952 च्या लॉर्ड्सवरील कसोटीत 184 धावा करत 196 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर 1962 साली पॉली यांनी 172 नाबाद धावा करत 107 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. ज्यानंतर आज जाडेजाने 175 नाबाद धावा करत 41 धावांच्या बदल्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत.
असा पार पडला सामना
सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. तर कोहली 45 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या दिवशी जाडेजाने उत्तम सुरुवात केली त्याला आश्विनची साथ मिळाली. आश्विन 61 धावा करुन बाद झाला तर जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला. अखेर 574 धावांवर भारताने डाव घोषित केला. ज्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या दिवस अखेर 108 धावा करत 4 विकेट गमावल्या. ज्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास 6 विकेट्स भारताने मिळवल्या. ज्यानंतर श्रीलंकेला फॉलोऑन मिळाल्याने श्रीलंकेने दुसरा डाव सुरु केला. ज्यात एन. डिकवेला (नाबाद 51) याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने 178 धावांवर श्रीलंका पुन्हा सर्वबाद झाली. ज्यामुळे भारताने एक डाव आणि 222 धावांनी सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- IND vs SL, 1st Test: रवींद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha