KL Rahul : अम्पायरनं निर्णय दिला, के. एल. राहुलला आयपीएलच्या नियमाची आठवण, रोहित शर्माकडे धावत गेला अन् म्हणाला... व्हिडीओ व्हायरल
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली एकदिवसीय लढत सुरु आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 230 धावा केल्या आहेत.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात पहिली वनडे मॅच सुरु आहे. रोहित शर्मा, (Rohit Sharma) विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल (KL Rahul) यांनी आजच्या मॅचमधून भारतीय संघात पुनरागमन केलं. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखून ठेवलं. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 बाद 230 धावा केल्या. भारताला विजयासाठी 231 धावांची गरज आहे. या दरम्यान केएल. राहुल आणि रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
भारताचा कॅप्टन रोहित शर्मानं श्रीलंकेविरुद्ध दोन वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिलं. रोहित शर्मानं मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग यांच्यावर भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा होती. रोहित शर्मानं मध्यमगती गोलंदाज म्हणून शिवम दुबेला देखील संधी दिली. शिवम दुबे श्रीलंकेच्या डावाची 14 वी ओव्हर टाकत होता. त्यामध्ये केएल. राहुल आणि रोहित शर्मामध्ये हा भन्नाट किस्सा घडला.
शिवम दुबे 14 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील चौथा बॉल शिवम दुबेनं टाकला. पंचांनी तो बॉल वाईड असल्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळं असमाधानी असल्यानं केएल राहुल थेट रोहित शर्माकडे धावत गेला. केएल राहुलनं रोहितला विचारलं आयपीएल वाला नियम इथं लागू नाही का?, यानंतर रोहित शर्मा आणि के.एल. राहुलमध्ये चर्चा झाली. पंचांचा निर्णय कायम राहिला.
आयपीएलमध्ये पंचांनी वाईड बॉल दिल्यास डीआरएस घेता येत होता. त्यामुळं के.एल. राहुलनं तसा प्रश्न विचारला.
दरम्यान, के.एल. राहुल 2024 च्या आयपीएलनंतर क्रिकेट खेळण्यासाठी आजच्या सामन्याद्वारे मैदानात उतरला. के.एल. राहुलनं भारताच्या वनडे संघात गेल्या वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपनंतर पुनरागमन केलं आहे.
रोहित शर्मा- केएल राहुलचा व्हिडीओ
KL Rahul - IPL wala rule hai kya 😭😭#INDvsSL pic.twitter.com/4uvpb5oP5s
— 🇮🇳🐐 (@ProteinKohlii) August 2, 2024
भारताची आक्रमक सुरुवात
श्रीलंकेनं भारतापुढं विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताच्या डावाची सुरुवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. रोहित शर्मानं 47 बॉलमध्ये 58 धावांची खेळी केली. शुभमन गिलनं 16 धावा केल्या. भारताचे दोन्ही सलामीवर बाद झाले असून वॉशिंग्टन सुंदर देखील बाद झाले आहेत. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर मैदानात आहेत. रोहित शर्मा आणि शुभमन गिलला डुनिथ वेलागे यानं बाद केलं.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-
पथुन निशांका, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समराविक्रम, चारिथ असलांका (कर्णधार), झेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलागे, अकिला धनंजया, असिश्था फर्नांडो, मोहम्मद शिराज
संबंधित बातम्या :