(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका सुरु होण्यापूर्वी रोहित शर्माचं मोठं वक्तव्य, टी 20 तील निवृत्तीवर हिटमॅन म्हणाला...
Rohit Sharma: रोहित शर्माचा एक व्हिडीओ बीसीसीआयनं शेअर केला आहे. या व्हिडीओत रोहित शर्मा टी 20 वर्ल्डकप आणि नव्या पर्वाबद्दल बोलत आहे.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय संघ मैदानात उतरला आहे. श्रीलंकेनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली एकदिवसीय मॅच सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयनं रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या मध्ये रोहितनं टी 20 वर्ल्ड कप आणि आगामी मालिकेसंदर्भात भाष्य केलं आहे. रोहित शर्मानं टी 20 वर्ल्ड कपचं विजेतेपद मिळवल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओत याबाबत रोहितनं टी 20 क्रिकेटबाबत मोठं वक्तव्य केलंय.
रोहित शर्मा काय म्हणाला?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची मालिका आजपासून सुरु झालीय. त्यापूर्वी बीसीसीआयनं शेअर केलेल्या व्हिडीओत तो म्हणतो तुमचा कर्णधार रोहित शर्मा बोलतोय. व्हिडीओच्या सुरुवातीला रोहित शर्मा सोबत टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी पाहायला मिळते. रोहित त्यात म्हणतो, " वाह! काय महिना होता तो, मजा आली, अनेक आठवणींचा, ऐतिहासिक क्षण आयुष्यभर आमच्या सोबत राहतील. आता असं वाटतं की मी छोट्या फॉरमॅटसाठी आपले पॅड घालून खेळू शकतो.. रोहित शर्मा पुढं म्हणतो की, सोडून द्या भावांनो, माझ्याकडे वेळ होता, मी आनंद घेतला, आता पुढं जाण्याची वेळ आली आहे.
आमच्यासाठी मैदानावर परतण्याची वेळ झाली आहे. एकना नव्या पर्वासह, नव्या सुरुवातीसह आणि नव्या प्रशिक्षकासह असं रोहित शर्मा म्हणाला.
दरम्यान, रोहित शर्माचं वय सध्या 37 वर्ष आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 चं आयोजन भारत आणि श्रीलंकेकडून करण्यात आला. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघे फिट असतील तर ते 2027 चा वर्ल्ड कप खेळू शकतात, असं मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं म्हटलं होतं.
𝙏𝙝𝙞𝙨 𝙞𝙨 𝙮𝙤𝙪𝙧 𝘾𝙖𝙥𝙩𝙖𝙞𝙣 𝙍𝙤𝙝𝙞𝙩 𝙎𝙝𝙖𝙧𝙢𝙖 𝙨𝙥𝙚𝙖𝙠𝙞𝙣𝙜!🎙️ 🫡#TeamIndia | #SLvIND | @ImRo45 pic.twitter.com/jPIAwcBrU4
— BCCI (@BCCI) August 2, 2024
श्रीलंकेला तीन धक्के
भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या मॅचला सुरुवात झाली असून श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखलं. मोहम्मद सिराज, शिवम दुबे आणि अक्षर पटेल या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 20 ओव्हरमध्ये श्रीलंकेनं 3 विकेटवर 68 धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या :
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!