भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला रोखलं, निसांका- वेलागेच्या अर्धशतकानं डाव सावरला, रोहित सेनेपुढं किती धावांचं आव्हान?
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत सुरु आहे. श्रीलंकेनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 8 विकेटवर 230 धावा केल्या आहेत.
कोलंबो : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात झालेली आहे. कोलंबोत भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिली लढत सुरु आहे. श्रीलंकेनं पहिल्या एकदिवसीय मॅचमध्ये टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. श्रीलंकेनं भारताविरुद्ध 8 विकेटवर 230 धावा केल्या. श्रीलंकेच्या पथुन निसांका आणि डुनिथ वेलागे यांनी अर्धशतकं झळकावली.
पथुम निसांका यानं 56 धावा केल्या. यानंतर श्रीलंकेचा डाव डुनिथ वेलागे यानं सावरला. नाबाद खेळी करत वेलागेनं 67 धावांची खेळी केली. भारताकडून अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलनं दोन विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरनं एक विकेट घेतली.
श्रीलंकेनं भारतासमोर आता विजयासाठी 231 धावांचं आव्हान ठेवलं असून टी 20 मालिकेप्रमाणं भारत विजयानं सुरुवात करणार का हे पाहावं लागेल. भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के.एल. राहुल यांचा समावेश आहे. त्यामुळं भारतीय संघ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयानं सुरुवात करते का ते पाहावं लागेल. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात भारतानं टी 20 मालिकेत 3-0 असा विजय मिळवला आहे. आता रोहितसेना एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयानं सुरुवात करणार का हे पाहावं लागेल.
श्रीलकेच्या पथुम निसांका आणि डुनिथ वेलागे वगळता इतर फलंदाजांना चांगली धावसंख्या उभारता आली नाही. भारताविरुद्धची टी 20 मालिका गमावल्यानंतर श्रीलंकेचा एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल. तर, रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतीय संघ विजयानं सुरुवात करणार का हे पाहावं लागेल. विराट कोहली, के.एल. राहुल या सारखे दिग्गज खेळाडू भारतीय संघात परतले आहेत.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-
पथुन निशांका, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समराविक्रम, चारिथ असलांका (कर्णधार), झेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलागे, अकिला धनंजया, असिश्था फर्नांडो, मोहम्मद शिराज
संबंधित बातम्या :