IND vs SA Final: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात फायनल होणार, टी 20 वर्ल्ड कप बाबत दीड महिन्यापूर्वीची भविष्यवाणी खरी ठरली Video
IND vs SA T20 World Cup 2024 Final: टी 20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम फेरीच्या लढतीत भारत आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येणार आहेत.
नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात टी20 वर्ल्ड कपची (T20 World Cup 2024) फायनल मॅच होणार आहे. दोन्ही संघ बारबाडोसच्या केंसिंग्टन ओवलमध्ये होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघांनी सहभाग घेतला होता. यानंतर ग्रुप स्टेजमधून सुपर 8 मध्ये 8 संघ आले. आठ संघातून भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान हे चार संघ सेमी फायनलमध्ये पोहोचले. भारतानं इंग्लंडला पराभूत केलं तर दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला पराभूत केलं. दोन्ही संघ आता अंतिम सामन्यात आमने सामने येतील. भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहोचतील याबाबतची भविष्यवाणी भारतात आयपीएल सुरु असताना झाली होती. तुम्हाला विश्वास वाटणार नाही पण हे खरं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फिरकीपटू केशव महाराज दीड महिन्यांपूर्वी आयपीएल खेळत होता. केशव महाराज राजस्थन रॉयल्सकडून खेळतो. त्यानं टी 20 वर्ल्ड कपची फायनल भारत आणि दक्षिण आफ्रिकेत होईल, असं म्हटलं होतं.
केशव महाराज 2024 च्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत होता. 16 मे 2024 ला केशव महाराज यानं टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसंदर्भात भविष्यवाणी केली होती. त्यावेळी त्यानं म्हटलं होतं की, फायनल दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात होईल. केशव महाराज यानं यापूर्वी 2023 च्या वर्ल्ड कपमध्ये जाहीरपणे म्हटलं होतं दक्षिण आफ्रिका सेमी फायनलच्यापुढे जाणार नाही.
Maharaj predicted the #SAvIND final during IPL 🤯👏🏻 pic.twitter.com/18WIl7igBM
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 28, 2024
दक्षिण आफ्रिका पहिल्यांदा अंतिम फेरीत
दक्षिण आफ्रिकेनं 1992 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला होता. 32 वर्षानंतर दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये पोहोचली आहे. 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपपूर्वी दक्षिण आफ्रिका अनेकदा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. मात्र, त्यांना अंतिम फेरीत पोहोचता आलं नव्हतं. भारतानं आतापर्यंत आयसीसी स्पर्धांच्या 12 फायनल खेळल्या आहेत. त्यापैकी चारमध्ये त्यांना विजय मिळाला आहे. भारतानं दोन वनडे वर्ल्डकप, एकदा टी 20 वर्ल्डकप आणि एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
रोहित शर्मा इतिहास रचणार
रोहित शर्मा भारताचा एकमेव कर्णधार ठरला आहे. ज्याच्या नेतृत्त्वात टीम इंडिया कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया आजची फायनल जिंकून कोच राहुल द्रविड यांना रिटायरमेंटचं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमधील पराभव विसरुन टीम इंडिया मैदानात उतरेल.
संबंधित बातम्या :