IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब प्रदर्शन, आगामी टी-20 विश्वचषकातून चार खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता
IND vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची टी-20 मालिका पार पडली.
IND vs SA T20 Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नुकतीच पाच सामन्यांची टी-20 मालिका पार पडली. या मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना पावसामुळं रद्द झाल्यानं मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघानं फक्त 3.3 षटकात दोन विकेट्स गमावून 28 धावा केल्या. पंरतु, त्यानंतर पावसानं हजेरी लावली. त्यामुळं सामना थांबवला गेला. अखेर काही तासानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मालिकेत खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
ऋषभ पंत
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेत भारताचा सलामीवीर केएल राहुलकडं भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. पंरतु, मालिका सुरु होण्यापूर्वीच त्याला दुखापत झाली. ज्यामुळं ऋषभ पंतकडं संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली. या मालिकेत ऋषभ पंतला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं पाच सामन्यांच्या टी-20 सामन्यात 14.50 च्या सरासरीनं आणि 105.45 स्ट्राईक रेटनं 58 धावांची खेळी केली. त्याला संपूर्ण मालिकेत चार चौकार आणि दोन षटकार मारले आहेत.
श्रेयस अय्यर
दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेपूर्वी भारतानं श्रीलंकेशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली होती. या मालिकेत श्रेयस अय्यरनं तिन्ही सामन्यात सलग तीन अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. परंतु, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकतीच पार पडलेल्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरनं निराशाजनक कामगिरी केलीय. या मालिकेत त्यानं 23.50 च्या सरासरीनं 123.68 स्ट्राईक रेटनं 94 धावा केल्या आहे. ज्यात चार चौकार आणि सात षटकारांचा समावेश आहे.
अक्षर पटेल
या मालिकेतील पाच सामन्यातील तीन डावात अक्षर पटेलनं 23 च्या सरासरीनं आणि 135 च्या स्ट्राईक रेटनं 23 धावा केल्या. याशिवाय या मालिकेत अक्षर पटेलला तीन विकेट्स घेता आल्या आहेत.
ऋतुराज गायकवाड
भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडसाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका चांगली ठरली नाही. या मालिकेत त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानं या मालिकेत 19.20 च्या सरासरीनं आणि 131 च्या स्ट्राईक रेटनं 96 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-