IND vs SA T20 Live Streaming : कटकच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, कधी, कुठे पाहाल दुसरा टी20 सामना?
IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे.
![IND vs SA T20 Live Streaming : कटकच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, कधी, कुठे पाहाल दुसरा टी20 सामना? IND vs SA 2nd T20 Live Streaming When Where To Watch India vs South Africa T20 Live Telecast Online IST IND vs SA T20 Live Streaming : कटकच्या मैदानात रंगणार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना, कधी, कुठे पाहाल दुसरा टी20 सामना?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/11/23f254722984f7d3fdce387b575170ae_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India vs South africa Live : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यानंतर आत दुसरा सामना कटकमध्ये खेळवला जात आहे. आजच्या सामन्यात विजयासाठी भारताचा संघ प्रयत्नांची नक्कीच शिकस्त करेल. तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यातही विजय मिळवून आघाडी वाढवण्याच्या तयारीत असेल. आज पार पडणाऱ्या दुसऱ्या सामन्यांत अंतिम 11 मध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
कधी आहे सामना?
आज 12 जून रोजी होणारा भारत आणि दक्षिण आफ्रिका हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.
कुठे आहे सामना?
हा सामना कटकच्या बाराबती मैदानावर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका हा आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका Head to Head
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला. आता देखील मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकत वर्चस्व घेतलं आहे.
हे देखील वाचा-
- IND vs SA: मॅच बघायला जाताय की हाणामारी करायला? सामनादरम्यानचा फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ एकदा बघाच!
- कसोटीत 500 विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज कोण? फक्त सात जणांनाचं गाठता आलाय विक्रमी टप्पा
- IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यातच चहलकडे विक्रम करण्याची संधी; घ्याव्या लागतील फक्त 3 विकेट्स
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)