(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs PAK : पाकिस्तानला 166 धावांत गुंडाळलं, भारताचा 4 धावांनी विजय, सचिन-अख्तरच्या टशनपेक्षा पहिल्या वनडेतील जबरदस्त थरार
IND vs PAK : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार रंगणार आहे.
World Cup 2023 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी आमना सामना होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरार रंगणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1952 पासून क्रिकेट खेळले जात आहे. 1978 मध्ये वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा आमने सामने आले होते. कसोटी आणि वनडेच्या सलामीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.
भारत-पाकिस्तान यांच्यात पहिला कसोटी -
लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानविरोधात पहिला कसोटी सामना खेळला होता. हा सामना दिल्लीच्या मैदानात झाला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना 372 धावा केल्या होत्या. या सामन्यात विजय हजारे यांनी 76 धावांची खेळी केली होती. विजय मांजरेकर यांनी 23 धावांचे योगदान दिले होते. हेमू अधिकारी यांनी नाबाद 81 धावांची खेळी केली. भारताने दिलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात 150 धावांत आटोपला. तर दुसऱ्या डावात 152 धावांपर्यंतच मजल मारु शखला. पाकिस्तान संघाने हा सामना अब्दुल करदार यांच्या नेतृत्वात खेळला होता.
भारताने जिंकला होता पहिला वनडे -
कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानविरोधात वनडे सामनाही खेळला होता. भारताने कसोटीशिवाय वनडे सामनाही जिंकला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1978 मध्ये पहिला वनडे सामना झाला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 170 धावांपर्यंत मजल मारली होती. दिलीप वेंगसरकर यांनी 34 धावांचे योगदान दिले होते. सुरिंदर अमरनाथ यांनी 37 धावा चोपल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल पाकिस्तान संघानेही जोरदार फलंदाजी केली होती. पाकिस्तानच्या फलंदाजांनी जशास तसे उत्तर दिले होते. पण हा सामना भारताने जिंकला होता. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 166 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून माजिद खान यांनी सर्वाधिक धावांची खेळी केली.
वनडेमध्ये पाकिस्तान वरचढ -
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 134 वेळा आमनासामना झाला आहे. यामध्ये पाकिस्तानच्या संघाने 73 सामन्यात विजय मिळवला आहे. तर भारतीय संघाने 56 सामन्यात बाजी मारली आहे. म्हणजेच, आतापर्यंतच्या वनडे सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध 73 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागलाय. ही आकडेवारी पाहता एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं पारडे जड असल्याचे दिसतेय. 5 सामन्याचा निकाल लागलेला नाही.
आणखी वाचा :
सचिनचा षटकार, वीरुचे चौकार, व्यंकटेश प्रसादची खुन्नस, भारत-पाक सामन्यातील 7 थरारक क्षण