IND vs PAK LIVE Score: पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द , लाईव्ह अपडेट एका क्लिकवर
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चार वर्षांनतर लढत होणार आहे.
LIVE
Background
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीला आता आवघे काही तास शिल्लक आहेत. 2019 नंतर भारत आणि पाकिस्तान एकदिवसीय सामना खेळत आहेत. या हायहोल्टेज सामन्याकडे क्रीडा चाहत्यांचे लक्ष लागले आहे. शनिवारी दुपारी या सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पिच रिपोर्ट, प्लेईंग 11 अन् इतर बाबी जाणून घेऊयात..
हेड टू हेट स्थिती काय ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायहोल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 132 एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.
हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?
आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.
कुठे होणार सामना, कशी आहे खेळपट्टी ? -
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात ज्या मैदानावर सामना झाला तिथेच भारत आणि पाकिस्तानची लढत होणार आहे. कँडी येथील पल्लेकेले स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत करते... मधल्या षटकात चेंडू स्विंगही होतो... त्यावेळी फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना लो स्कोअरिंग होऊ शकतो.
पावसाची शक्यता -
कँडीमध्ये शनिवारी पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पावसामुळे सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. हवमान विभागाच्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ५१ टक्के पावसाची शक्यता आहे. तर दुपारी ७० टक्के पाऊस कोसळू शकतो. संध्याकाळी पावसाचा अंदाज नाही. पावसामुळे सामन्यत व्यत्यय येण्याची दाट शक्यता आहे.
कुणाचे पारडे जड -
भारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की चाहत्याच्या नजरा सामन्याकडेच असतात. एक काळ असा होता की, भारताची फलंदाजी आणि पाकिस्तानची गोलंदाजी असा सामना असायचा... पण आता पाकिस्तानच्या तोडीस तोड भारताची गोलंदाजी आहे आणि भारताच्या फलंदाजीला आव्हान देणारी पाकिस्तानची फलंदाजी आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज पाकिस्तानच्या गोलंदाजापेक्षा कमी नाहीत. पाकिस्तानची फलंदाजीही दमदार आहे. बाबर आझम, मोहम्मद रिझवान, सलमान अली आगा आणि इमाम उल हक शानदार फॉर्मात आहेत. इफ्तिखारही रंगात आहे. शनिवारी रोमांचक सामना होईल. दोन्ही संघ तुल्यबळ दिसत आहेत.
पाकिस्तानची प्लेईंग 11
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी
भारताची संभाव्य प्लेईंग 11
ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा(कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?
आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?
भारतात कधी पाहता येणार IND vs PAK हायव्होलटेज सामना?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात येणारा महामुकाबला भारतात स्टार स्पोर्ट्समार्फत टीव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.
लाईव्ह स्ट्रीम फ्रीमध्ये कुठे पाहता येणार?
टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यातील हा हायव्होलटेज सामना डिस्ने प्लस हॉटस्टारवर विनामूल्य थेट प्रसारित केला जाईल. मात्र, मोफत लाईव्ह स्ट्रिमिंग सुविधा केवळ मोबाईल युजर्ससाठी असेल.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.
पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द
पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द
India vs Pakistan Live Updates: पावसामुळे षटके कमी करावी लागल्यास किती मिळणार टार्गेट
पावसामुळे खेळ प्रभावित झाला आहे. त्यामुळे षटके कमी होणार, आता हे जवळपास निश्चित झाले आहे. 40 षटकांचा खेळ झाल्यास पाकिस्तानला 239 धावांचे आव्हान मिळेल. 30 षटकांचा खेळ झाल्यास 203 आणि 20 षटकांचा खेळ झाल्यास 155 धावांचे आव्हान मिळेल.
साडेदहा वाजेपर्यंत खेळ सुरुवात झाला तर पाकिस्तानला 20 षटके फलंदाजी करता येणार आहे.
साडेदहा वाजेपर्यंत खेळ सुरुवात झाला तर पाकिस्तानला 20 षटके फलंदाजी करता येणार आहे. तोपर्यंत पाऊस थांबला नाही तर सामना रद्द केला जाईल. दोन्ही संघाला 1-1 गुण दिले जातील.
The cut-off time for a 20 over game is 10.27 PM IST. [Star Sports] pic.twitter.com/IFxKuQmIvW
— Johns. (@CricCrazyJohns) September 2, 2023
सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय
सामन्यात पुन्हा पावसाचा व्यत्यय... खेळाला उशीरा सुरुवात होणार
पल्लेकेले येथे पावसाला सुरुवात
The rain has returned at the Pallekele Stadium. pic.twitter.com/Uw1g6NFxNh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 2, 2023