(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, शामी-अक्षरला स्थान नाही, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: भारताचा कर्णधार रोहित शर्माने हायहोल्टेज सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे.
IND vs PAK Asia Cup 2023 LIVE Score: भारताचा कर्णधार रोहित शर्माने हायहोल्टेज सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह याचे टीम इंडियात कमबॅक झालेय. तर दुसरीकडे पाकिस्तानने नेपाळविरोधातील विजयी संघ मैदानात उतरवला आहे. नाणेफेकीनंतर बोलताना बाबर आझम याने प्रथम फलंदाजी करायची होती, असे सांगितले. रोहित शर्माने मोक्याच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. आता सामना कोणत जिंकणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मोहम्मद शामी याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळालेले नाही. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्या जोडीला शार्दूल ठाकूर याला स्थान दिलेय. मध्यक्रममध्ये श्रेयस अय्यर याचे कमबॅक झालेय. पाकिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
पाकिस्तानची प्लेईंग 11
इमाम उल हक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, सलमान आगा, मोहम्मद नवाज, शादाब खान, हारिस रऊफ, नसीम शाह आणि शाहिन शाह आफ्रिदी
भारताची प्लेईंग 11 -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
India bat first in Pallekele against Pakistan 🏏
— ICC (@ICC) September 2, 2023
What target will they set?#AsiaCup2023 pic.twitter.com/liSIserWF8
🚨 Toss & Team Update 🚨
— BCCI (@BCCI) September 2, 2023
Captain @ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected to bat against Pakistan. #INDvPAK
A look at our Playing XI 🔽
Follow the match ▶️ https://t.co/hPVV0wT83S#AsiaCup2023 pic.twitter.com/onUyEVBwvA
हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ?
आशिया कप स्पर्धेतील टीम इंडियाचा हा पहिलाच सामना असेल. तर पाकिस्तानचा दुसरा सामना असेल. पाकिस्ताननं आपला पहिला सामना नेपाळविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात पाकिस्ताननं धमाकेदार विजय मिळवला आहे. यापूर्वी 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आले होते, ज्यामध्ये टीम इंडियानं बाजी मारली होती. आणि 2 सप्टेंबरला आशिया कप स्पर्धेत खेळला जाणारा टीम इंडिया-पाकिस्तानचा हायव्होलटेज सामन्यात कोण बाजी मारणार ? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय.
हेड टू हेट स्थिती काय ?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हायहोल्टेज सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत 132 एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताने 55 सामने जिंकले आहेत आणि पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत.