पाकिस्तानला मोठा धक्का, हॅरिस रौफ दुखापतग्रस्त, बाबरचे गोलंदाजी पर्याय झाले कमी
India vs Pakistan, Haris Rauf : मुसळधार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला उशिरा सुरुवात झाली आहे.
India vs Pakistan, Haris Rauf : मुसळधार पावसामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला उशिरा सुरुवात झाली आहे. पण राखीव दिवशी सामना सुरु होण्यापूर्वीच पाकिस्तानला धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे आज हॅरिस रौफ गोलंदाजी करु शकणार नाही. टीम इंडियासाठी ही दिलासादायक बाब आहे. रविवारी हॅरिस रौफ याला दुखापत झाली होती, त्यामुळे तो आज गोलंदाजी करु शकणार नाही. खबरदारीचा उपाय म्हणून हॅरिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही.
हॅरिस रौफ याला रविवारी दुखापत झाली होती. त्याचा एमआरआय काढण्यात आला. तो नॉर्मल आला, पण खबरदारी म्हणून हॅरिस रौफ आज गोलंदाजी करणार नाही. हॅरिस रौफ डॉक्टरांच्या निगरानीखाली आहे. हॅरिस रौफ याने पाच षटकात फक्त 27 धावा खर्च केल्या होत्या. हॅरिस रौफच्या अनुपस्थितीचा फटका बाबर आझम याला बसण्याची शक्यता आहे. डेथ ओव्हरमध्ये हॅरिस रौफ भेदक मारा करण्यात तरबेज आहे.
Haris Rauf won't bowl today against India as a precautionary measure. pic.twitter.com/Gvh36C4hcM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 11, 2023
हॅरिस रौफ दुखापतग्रस्त झाल्यामुळे बाबर आझमच्या अडचणी वाढल्या आहेत. शादाब खानही महागडा ठरलाय. त्यामुळे बाबर आझम फहीम, सलमान आगा आणि इफ्तिखार अहमद हे पर्याय असतील.
रविवारी काय झाले होतं ?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी बाबरचा निर्णय चुकीचा ठरवला. दोघांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई केली. शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 100 चेंडूत 121 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने 49 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये चार षटकार आणि सहा चौकारांचा समावेश होता. तर गिल याने 52 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने 10 चौकार लगावले. आजच्या दिवशाचा सामना थांबला तेव्हा विराट कोहली 8 आणि केएल राहुल 17 धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाने 24.1 षटकात दोन बाद 147 धावा केल्या आहेत. उद्या, सोमवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील उर्वरित सामना होणार आहे. रविवारी खेळ जिथे संपला तेथूनच आज सामन्याला सुरुवात होणार आहे.
कोलंबोत विराट कोहलीच किंग, मागील 3 डावात शतके, आजही मोठ्या खेळीची अपेक्षा