![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ind vs Pak Video : अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... रिचा घोषने एका हातात घेतला जबरदस्त कॅच, पाकिस्तानी खेळाडूंना बसेना विश्वास
IND vs PAK 2024 Women T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघामध्ये खेळला जात आहे.
![Ind vs Pak Video : अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... रिचा घोषने एका हातात घेतला जबरदस्त कॅच, पाकिस्तानी खेळाडूंना बसेना विश्वास IND vs PAK 2024 Women T20 World Cup Richa Ghosh takes a brilliant one-handed catch to dismiss Fatima Sana Marathi news Ind vs Pak Video : अद्भुत अविश्वसनीय अकल्पनीय... रिचा घोषने एका हातात घेतला जबरदस्त कॅच, पाकिस्तानी खेळाडूंना बसेना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/06/3ad34cd0aa5b2ae800211c789600b86a17282181611481091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IND vs PAK 2024 Women T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कप 2024 चा सामना भारत आणि पाकिस्तानच्या महिला संघामध्ये खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तो काय योग्य ठरला नाही. पाकिस्तानी संघाची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. दरम्यान, भारतीय यष्टीरक्षक रिचा घोषने असा एक झेल घेतला आहे. हे पाहून सगळेच त्याची तुलना एमएस धोनीशी करत आहेत.
रिचा घोषचा जबरदस्त कॅच
या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना आक्रमक खेळत होती. आशा शोभनाच्या षटकात तिने लागोपाठ चौकार मारले. 14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आशा शोभनाने ऑफ स्टंपवर चेंडू टाकला. या चेंडूवर फातिमा सनाने तिची बॅट खूप वेगाने फिरवली, पण तिच्या बॅटचा कट घेऊन चेंडू रिचा घोषच्या हातात गेला. तिने तो कॅच एका हाताने पकडला. फातिमा सनाची विकेट टीम इंडियासाठी खूप मोठी होती. या सामन्यात ती खूप वेगाने धावा करत होती. त्याने 8 चेंडूत केवळ 13 धावा केल्या होत्या.
WHAT. A. CATCH. 🤯#RichaGhosh's superb reflexes see 🇵🇰 skipper #FatimaSana's back off #AshaSobhana's bowling! 🔥
— Star Sports (@StarSportsIndia) October 6, 2024
What total will Pakistan post? 💭
📺 Watch #WomensWorldCupOnStar 👉 #INDvPAK LIVE NOW pic.twitter.com/LoTtUc9JUA
पाकिस्तानी फलंदाजी ठरली अपयशी
भारताविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजी काही विशेष करू शकले नाही. या सामन्यात त्यांनी 20 षटकात 8 गडी गमावून 105 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियासाठी अरुंधती रेड्डी आणि श्रेयंका पाटील हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले आहेत. या सामन्यात अरुंधती रेड्डीने तीन तर श्रेयंका पाटीलने दोन विकेट्स घेतल्या आहेत. भारताला आता विजयासाठी 120 चेंडूत 106 धावांची गरज आहे. टीम इंडियाला हा सामना मोठ्या फरकाने जिंकायचा आहे. जेणेकरून त्यांचा नेट रन रेट चांगला होऊ शकेल. सध्या भारताचा नेट रन रेट -2.900 आहे.
भारत-पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन -
भारत : स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, एस सजना, श्रेयंका पाटील, आशा शोभना, रेणुका ठाकूर सिंग.
पाकिस्तान : मुनिबा अली (विकेटकीपर), गुल फिरोज, सिद्रा अमीन, निदा दार, आलिया रियाझ, ओमामा सोहेल, फातिमा सना (सी), तुबा हसन, नशरा संधू, सय्यदा अरुब शाह, सादिया इक्बाल.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)