(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs NZ ODI Series: ...तर न्यूझीलंडचं मालिका जिंकणार; पावसानं टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं
IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
IND vs NZ ODI Series: भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हॅमिल्टनच्या (Hamilton) सेडन पार्कवर (Seddon Park) खेळला गेलेला दुसरा एकदिवसीय सामना पावसामुळं रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाणेफेकीपूर्वीही पावसानं हजेरी लावली. परंतु, सामना वेळेत सुरू झाला. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. दोन वेळा सामना थांबवण्यात आला. परंतु, हॅमिल्टन येथील पावसाचा अंदाज पाहता अखेर सामना रद्द करण्यात आला. पावसामुळं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 नं पिछाडीवर असलेल्या टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अतिशय महत्वाचा होता. या मालिकेत पहिल्या सामन्यात टीम इंडियाला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवासह टीम इंडिया 1-0 नं पिछाडीवर आहे. हॅमिल्टन येथील सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न होता. पण पावसामुळं हा रद्द करण्यात आलाय. शेवटचा एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबरला क्राइस्टचर्चमध्ये होणार आहे. या सामन्यात भारतानं विजय मिळवला तर, मालिका बरोबरीत सुटेल. जर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पावसानं गोंधळ घातल्यास मालिका न्यूझीलंडच्या नावावर होईल.
ट्वीट-
2ND ODI. New Zealand vs India - Match Abandoned https://t.co/frOtF82cQ4 #NZvIND
— BCCI (@BCCI) November 27, 2022
रोहित शर्मा, विराट कोहलीसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. यामुळं न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीत मालिकेत भारताचा सलामीवीर शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे.
भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंड संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साऊदी, अॅडम मिल्ने, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, मायकेल ब्रेसवेल, ईश सोढी.
हे देखील वाचा-