एक्स्प्लोर

IND vs IRE 1st T20: तळाच्या फलंदाजांनी झोडपले, आयर्लंडचे भारतापुढे 140 धावांचे आव्हान

IND vs IRE 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

IND vs IRE 1st T20: पहिल्या टी20 सामन्यात आयर्लंडने भारतासमोर विजयासाठी 140 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आयर्लंडने निर्धारित 20 षटकांत 7 विकेट गमावत 139 धावा केल्या. बॅरी मॅकग्राथी आणि कर्टिस कॅम्फर यांच्यात सातव्या विकेटसाठी पन्नासहून अधिक धावांच्या भागीदारीने संघाची धावसंख्या 139 धावांपर्यंत पोहोचवली. बॅरी मॅकग्राथीने  नाबाद 51 धावा केल्या. तर कर्टिस कॅम्पफरने धावांचे योगदान दिले. भारताकडून कर्णधार जसप्रीत बुमराहशिवाय प्रसिद्ध कृष्णा आणि रवी बिश्नोईने 2-2 बळी घेतले. 

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडची सुरुवात खराब झाली. भारताच्या गोलंदाजांनी सुरुवातीला अतिशय भेदक मारा करत आयर्लंडच्या फलंदाजांना तंबूत धाडले होते. 31 धावांत आयर्लंडचे पाच गडी तंबूत परतले होते. सुरुवातीची फळी लवकर बाद झाल्यानंतर आयर्लंडचा डाव लवकर संपणार का ? असे वाटत होते. पण तळाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. आयर्लंडने दमदार पुनरागमन करत भारतीय गोलंदाजी फोडून काढली. 31 धावांत आयर्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. कर्णधार  पॉल स्ट्रलिंग यालाही मोठी खेळी करता आली नाही. आघाडीचेचार फलंदाजांना तर दुहेरी धावसंख्याही ओलांडता आली नाही. 

कर्टिस कम्फर आणि बैरी मैक्ग्राथी यांनी ताबोडतोड फलंदाजी करत आयर्लंडची धावसंख्या वाढवली. बैरी मैक्ग्राथी याने अखेरच्या चेंडूपर्यंत झुंज दिली. बैरी मैक्ग्राथी याने 33 चेंडूत चार षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने नाबाद 51 धावांची खेळी केली. तर कर्टिस कम्फर  याने 33 चेंडूत एक षटकार आणि तीन चौकाराच्या मदतीने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.

बुमराहचे दमदार पुनरागमन - 

तब्बल वर्षभरानंतर जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानावर परतला. त्याने दणक्यात कमबॅक केले. बुमराहने पहिल्याच षटकात चार धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या होत्या. बुमराह याने चार षटकात 24 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. बुमराहने आपले अखेरच्या षटकात फक्त एक धाव दिली. 

अर्शदीपचे महागडे षटक -

अखेरच्या षटकात अर्शदीप सिंह याने खराब गोलंदाजी केली. अर्शदीप सिंह याने अखेरच्या षटकात तब्बल 22 धावांची लयलूट केली. अर्शदीपच्या अखेरच्या षटकात  McCarthy याने अर्शदीपची गोलंदाजी फोडून काढली. त्याने दोन षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने 22 धावा चोपल्या. जसप्रीत बुमराह याने 19 व्या षटकात भेदक मारा करत आयर्लंडच्या गोलंदाजांना थोपवलं होतं. बुमराहने 19 व्या षटकात फक्त एक धाव देत धावसंख्येला आवर घातली होती. पण बुमराहच्या मेहनतीवर अर्शदीप सिंह याने पाणी फेरले. 

भारताची गोलंदाजी कशी ?

भारताकडून जसप्रीत बुमराह, पदार्पण करणारा प्रसिद्ध कृष्णा आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर अर्शदीप याला एक विकेट मिळाली. वॉशिंगटन सूंदर आणि शिवब दुबे यांच्या विकेटची पाटी कोरीच राहिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहाAditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Embed widget