एक्स्प्लोर

Ind vs Eng 5th Test : 'विराट, देशाला तुझी गरज....' ब्रुक-रुटकडून टीम इंडियाची धुलाई सुरु असताना कोहलीला कुणी घातली साद?

England vs India 5th Test Update : ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 6 विकेट गमावून 339 धावा केल्या आहेत.

Shashi Tharoor on Virat Kohli : ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 6 विकेट गमावून 339 धावा केल्या आहेत. खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला, त्यानंतर पावसाने भारतीय गोलंदाजांची लय बिघडवली. सततच्या पावसामुळे खेळ वेळेपूर्वीच घोषित करण्यात आला. जेमी स्मिथ सध्या 2 धावा काढून खेळत आहे, तर जेमी ओव्हरटनला खातेही उघडता आलेले नाही. इंग्लंडला विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे आणि भारताला 4 विकेटची आवश्यकता आहे.

यादरम्यान, अखेरच्या सामन्यात भारताच्या विजयाची शक्यता कमी असतानाच काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी विराट कोहलीची आठवण झाली. त्यांनी भावनिक संदेशातून विराट कोहलीला पुन्हा कसोटीत परतण्याचं आवाहन केलं आहे.

शशी थरूर यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "या मालिकेतील अनेक क्षणी मला विराट कोहलीची कमतरता जाणवत होती, त्याचं धैर्य, जोश, मैदानावरची प्रेरणादायक उपस्थिती आणि फलंदाजीतील जादू कदाचित हा सामना वेगळ्या मार्गाने गेला असता. अजून वेळ गेलेली नाही का? विराट, देशाला तुझी गरज आहे."

विराट कोहलीने मे महिन्यात घेतली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

12 मे 2025 रोजी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहून म्हटलं होतं, "ही फॉर्मट माझ्यासाठी नेहमीच खास राहिली आहे. अनेक तासांची मेहनत, हजारो क्षण जे कोणी पाहिले नाहीत पण कायम मनात राहिले… हे सर्व माझं आयुष्य बनलं. आता या फॉर्मॅटपासून दूर जातोय, हे सोपं नाही, पण योग्य वाटतंय. मी सगळं काही दिलं, आणि या खेळाने मला त्याच्या पलिकडचं दिलं. मी कृतज्ञ मनाने निरोप घेतो." 

विराटच्या पुनरागमनासाठी देशभरातून आवाज उठतोय

विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर संपूर्ण देशभरातून चाहत्यांकडून आणि क्रिकेट तज्ज्ञांकडून त्याच्या पुनरागमनाची मागणी सातत्याने होत आहे. शशी थरूर यांचे हे भावनिक आवाहन लाखो भारतीयांची भावना व्यक्त करतंय, जे पुन्हा एकदा विराटला पांढऱ्या जर्सीत खेळताना पाहू इच्छितात.

इंग्लंड विजयाच्या दिशेने... 

ओव्हलमध्ये सुरू असलेल्या या निर्णायक कसोटीत इंग्लंड 2-1 ने आघाडीवर आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. इंग्लंडचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू क्रिस वोक्स दुखापतीमुळे अनुपस्थित असतानाही भारताला संधी साधता आली नाही. मोहम्मद सिराजकडून मोठी चूक झाली, जेव्हा त्याने हॅरी ब्रूकचा झेल घेतला पण बाउंड्रीवर पाय लागल्याने झेल 6 धावांमध्ये बदलला आणि तो निर्णायक क्षण ठरला.

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget