IND vs ENG 3rd Test Live Score: मोठ्या अंतरानंतर इंग्लंडची दुसरी विकेट, रवींद्र जडेजाच्या शानदार चेंडूवर हसीब हमीद 68 धावांवर क्लीन बोल्ड
नमस्कार! भारत आणि इंग्लंड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेशी संबंधित एबीपी माझाच्या थेट ब्लॉगवर आपले स्वागत आहे. येथे आम्ही तुम्हाला तिसऱ्या कसोटी सामन्याची संपूर्ण परिस्थिती सांगू.

Background
IND vs ENG 3rd Test Score LIVE Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लीड्सच्या हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. लॉर्ड्स कसोटीत नेत्रदीपक विजयाची नोंद केल्यानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या संघाला तिसऱ्या कसोटीत आपली आघाडी मजबूत करण्याची संधी असताना, इंग्लंडचा संघ एकाच वेळी अनेक बदल करून मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
जिंकल्यानंतरही विराट कोहलीसाठी प्लेईंग 11 खेळाडू निवडीची समस्या आहे. टीम इंडियाने आर अश्विनला पहिल्या दोन कसोटीत संधी दिलेली नाही. अश्विनसारखा स्टार फिरकीपटू जो फॉर्ममध्ये आहे त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय सोपा नाही. पण संघाच्या चार वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे विराट अश्विनला तिसऱ्या कसोटीत संधी देतो की नाही, हे पाहणे खूप मनोरंजक असणार आहे.
विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा फॉर्मही टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे. या तीन खेळाडूंना या मालिकेत आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहली जवळपास दोन वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतकाच्या प्रतीक्षेत आहे. दुसरीकडे, चेतेश्वर पुजाराने 2018 पासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले नाही.
मात्र, इंग्लंडचा संघ तिसऱ्या कसोटीत मोठ्या बदलांसह मैदानात उतरू शकतो. डेव्हिड मलान खेळण्यासाठी सज्ज झाला असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसणार आहे. ऑली पोपला 6 व्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळू शकते. इंग्लंड संघ तीन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानात उतरू शकतो.
मोठ्या अंतरानंतर इंग्लंडची दुसरी विकेट
मोठ्या अंतरानंतर इंग्लंडची दुसरी विकेट, रवींद्र जडेजाच्या शानदार चेंडूवर हसीब हमीद 68 धावांवर क्लीन बोल्ड. इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 159
इंग्लंड भक्कम स्थितीत
इंग्लंड भक्कम स्थितीत, हमीद आणि मलान उत्तम फॉर्मात; एका गड्याच्या बदल्यात 159 धावा




















