(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohammed Siraj: एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोहम्मद सिराजचा धुमाकूळ; कॅलेंडर वर्षात भारतासाठी घेतल्यात सर्वाधिक विकेट्स
IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय.
IND vs BAN 2nd ODI: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ढाकाच्या (Dhaka) शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर (Shere Bangla National Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या फलंदाजांचं कंबरडं मोडणाऱ्या भारताचा युवा गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) दुसऱ्या सामन्यातही आक्रमक गोलंदाजी करताना दिसतोय. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोहम्मद सिराजनं अनामूल हक आणि कर्णधार लिटन दासला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत यंदाच्या वर्षात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा मान मिळवलाय. त्यानं भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला मागं टाकलंय.
कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद सिराज अव्वल स्थानी पोहचलाय. त्यानं 14 सामन्यात 23 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर युजवेंद्र चहल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 21 विकेट्सची नोंद आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारताचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णानं कॅलेंडर वर्षात 15 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर शार्दूल ठाकून 15 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे.
कॅलेंडर वर्षात भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज:
गोलंदाज | सामने | विकेट्स |
मोहम्मद सिराज | 14 | 23 |
युजवेंद्र चहल | 14 | 21 |
प्रसिद्ध कृष्णा | 15 | 15 |
शार्दूल ठाकूर | 15 | 15 |
संघ:
भारताची प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.
बांगलादेशती प्लेइंग इलेव्हन:
नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान.
हे देखील वाचा-