Ind vs Aus | 'आमचा एकतर्फी पराभव झाला'; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर विराट कोहलीचं वक्तव्य
फलंदाजांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसर्या वन-डे सामन्यात भारताला 51 धावांनी पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फॉर्ममध्ये असलेल्या स्टीव्ह स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून 64 चेंडूत शतक झळकावले.
![Ind vs Aus | 'आमचा एकतर्फी पराभव झाला'; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर विराट कोहलीचं वक्तव्य Ind vs Aus we were ineffective with the ball and didnt hit the areas says virat kohli Ind vs Aus | 'आमचा एकतर्फी पराभव झाला'; ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवानंतर विराट कोहलीचं वक्तव्य](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/30141241/Virat-Kohali01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिडनी : रविवारी खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाला विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताचा 51 धावांनी पराभव झाला. पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या संघाच्या गोलंदाजीबाबत निराशा व्यक्त केली. त्याचसोबत त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचं कौतुकही केलं. पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यामध्येही ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 390 धावांचं आव्हान ठेवलं. भारतीय संघाने 51 धावांनी सामना गमावला आणि यजमान संघाने वनडे सीरिजमध्ये 2-0 ने जिंकली.
सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली म्हणाला की, 'आमचा एकतर्फी पराभव झाला आहे. मला वाटतं की, आमच्या संघाची गोलंदाजी जास्त प्रभावी नव्हती. आम्ही सलग चांगली गोलंदाजी केली नाही. तसेच त्यांच्या संघातील फलंदाजांची फळी मजबूत असून त्यांना अचूक माहिती आहे की, सामना कसा आपल्याकडे खेचून आणायचा. तुम्ही पाहिलं तर आम्ही 340 (338) धावांपर्यंत पोहोचलो तरिदेखील 51 धावांनी सामना गमवावा लागला.'
कोहली म्हणाला की, 'स्कोअरबोर्ड पाहा, आम्ही 340 धावा केल्या आणि 51 धावांनी आमचा पराभव झाला. आम्हाला नेहमीच माहीत होतं की, त्यांनी दिलेल्या आव्हान गाठण सोपं नसणार आणि एक किंवा दोन विकेट्समुळे आम्हाला 13, 16 धावा प्रति ओव्हरच्या वेगाने करणं गरजेतं होतं. त्यामुळे आम्हाला सलग शॉट खेळायचे होते.' कोहली म्हणाला की, ऑस्ट्रेलियाच्या फिल्डर्सनी त्याचा आणि श्रेयस अय्यरला कॅच पकडत बाद केलं, तो त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट होता.
'मी आणि राहुल बोलत होतो की, जर आम्ही दोघं 40-41 ओव्हरपर्यंत खेळलो आणि शेवटच्या 10 ओव्हर्समध्ये 100 धावा जरी करायच्या असल्या तरी हार्दिक पंड्याच्या मदतीने आपण आव्हान गाठू शकतो. ही आमची रणनीति होती. परंतु, त्यांनी माझा आणि श्रेयस अय्यरला बाद करत सामना स्वतःच्या बाजूने फिरवला.' , असं विराट कोहली म्हणाला.
दरम्यान, या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याला गोलंदाजी करावी लागली. पांड्याने पहिल्या सामन्यानंतर सांगितलं होतं की, तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी पूर्णपणे फिट नाही. परंतु, दुसऱ्या वनडे सामन्यात कोहलीने त्याच्याकडे चेंडू दिला. यासंदर्भात बोलताना कोहली म्हणाला की, 'मला वाटतं की, त्यानेच या पीचवर गोलंदाजी करण्याचा प्लान सांगितला. त्याने चांगली गोलंदाजी केली. त्याने गोलंदाजी करणं प्लानमध्ये कुठेच नव्हतं. परंतु, मी त्याला केवळ विचारलं.' पांड्याने उत्तम गोलंदाजी केली. चार ओव्हर्समध्ये त्याने केवळ 24 धावा देत एक विकेटही घेतला. हा एक विकेट 104 धावा करणाऱ्या स्टीव्ह स्मिथचा होता.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)