IND vs AUS : अभिषेक शर्मा नव्हे भारताचा 'हा' खेळाडू धोकादायक, ऑस्ट्रेलियानं सावध राहावं, ॲडम गिलख्रिस्टचा इशारा...
IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका आज संपली. आता 5 सामन्यांची टी 20 मालिका 29 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे.

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका आज संपली. भारतानं तिसऱ्या वनडेत 9 विकेटनं विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. तर, ऑस्ट्रेलियानं मालिका 2-1 अशी जिंकली. आता भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील टी 20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे. या मालिकेत भारताचा सर्वाधिक धोकादायक खेळाडू कोण या प्रश्नाचं उत्तर देताना ॲडम गिलख्रिस्ट यानं कोणत्याही फलंदाजाचं नाव घेतलेलं नाही तर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचं नाव घेतलंय.
टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे स्टार खेळाडू टी 20 संघात असतील. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्ट यानं आस्ट्रेलियासाठी टी 20 मालिकेत अभिषेक शर्मापेक्षा अर्शदीप सिंग मोठं संकट असल्याचं म्हटलंय. अर्शदीप सिंग टी 20 मालिकेत सर्वाधिक विकेट मिळवेल, असं गिलख्रिस्टनं म्हटलंय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिकेपूर्वी गिलख्रिस्टला भारतीय खेळाडूंसंदर्भात विचारण्यात आलं.ऑस्ट्रेलियाच्या टीमला कोणत्या खेळाडूला घाबरायला हवं आणि मालिका कोण जिंकेल असं त्यांना विचारण्यात आलं. यावेळी गिलख्रिस्टनं अभिषेक शर्माऐवजी अर्शदीप सिंगची निवड केली. गिलख्रिस्ट म्हणाला की मला वाटतं अर्शदीप सिंग डावाच्या सुरुवातीला आणि शेवटी जबरदस्त गोलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. यासाठी मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या संघानं त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे.
अर्शदीप सिंगनं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन वनडेमध्ये 24 च्या सरासरीनं 3 विकेट घेतल्या होत्या.अभिषेक शर्मानं आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केल्यानं सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी केल्यानं आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला होता. त्यानं 7 सामन्यात 44.85 च्या सरासरीनं 200 च्या स्ट्राईक रेटनं 314 धावा केल्या होत्या. तर, अर्शदीप सिंगनं भारताच्या विजयात मोठी भूमिका मिळवली होती त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल 3-2 अशी राहील
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका कोण जिंकणार असं विचारलं गेलं. तेव्हा गिलख्रिस्टनं मालिकेचा निकाल 3-2 असा राहील, असं म्हटलं. मात्र, कोण जिंकणार हे त्यानं सांगितलं नाही.
टी 20 साठी भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सिंह, हर्षित सिंह, संजू सॅमसन, रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 सामन्यांचं वेळापत्रक
29 ऑक्टोबर - पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर - दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर - तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर - चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर - पाचवी टी20 (ब्रिसबेन)




















